एमजी विंडसर ईवी इन्स्पायर एडिशन लॉंच : भारतात फक्त 300 युनिट्स उपलब्ध
जेएसडब्ल्यू एमजी मोटरनं विंडसर ईवी इन्स्पायर एडिशन लॉंच केली. या कारचे फक्त 300 युनिट्स असून बुकिंग सुरू झालीय.

Published : October 9, 2025 at 5:23 PM IST
हैदराबाद: जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियानं विंडसर ईवी इन्स्पायर एडिशन लॉंच केली. या लिमिटेड एडिशन कारनं कमी कालावधीत 40,000 युनिट्सची विक्री केली आहे. 16.65 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किंमतीसह उपलब्ध असलेली ही कार बीएएएस (बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस) पर्यायासह 9.99 लाख रुपयांमध्ये मिळू शकते. फक्त 300 युनिट्ससह, ही एडिशन विजुअल अपग्रेड्स आणि एक्सेसरीजसह येत असून, 15 ऑक्टोबर 2025 पासून डिलिव्हरी सुरू होईल.
किंमत
ऑगस्ट 2024 मध्ये लॉंच झालेल्या विंडसर ईवीनं केवळ एका वर्षात 40,000 युनिट्स विक्री करून इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये धडाकेबाज एंट्री केली आहे. ही लिमिटेड एडिशन केवळ 300 युनिट्सपर्यंत मर्यादित असल्यानं, ग्राहकांसाठी ही कार खरेदी करण्याची संधी आहे. बुकिंग आजपासून सुरू झाली असून, डिलिव्हरी 15 ऑक्टोबर पासून होईल. इन्स्पायर एडिशनची किंमत 16.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर बीएएएस पर्याय निवडल्यास वाहनाची किंमत 9.99 लाख रुपयांपर्यंत कमी होते.
वैशिष्ट्ये
बाह्य डिझाइनमध्ये इन्स्पायर एडिशन ही एक आकर्षक ड्युअल-टोन थीम घेऊन येते. पर्ल व्हाइट आणि स्टॅरी ब्लॅक रंगाची ही कार ब्लॅक अलॉय व्हील्ससह येत असून, त्यावर रोज गोल्ड क्लॅडिंग आहे. ब्लॅक ओआरव्हीएम (आऊटसाइड रिअर व्ह्यू मिरर्स), इन्स्पायर ब्रँडिंग आणि एक्सेसरी पॅकमध्ये समाविष्ट रोज गोल्ड फ्रंट ग्रिल आणि बंपर कॉर्नर प्रोटेक्टर्स यामुळं ही कार अधिक स्टायलिश दिसते. ही एडिशन स्टँडर्ड विंडसर ईवीपेक्षा वेगळी ओळख निर्माण करते.
रिअर विंडो सनशेड्स आणि लेदर की
आंतरिक भाग देखील इन्स्पायर थीमशी जुळणारा आहे. सांग्रिया रेड आणि ब्लॅक लेदर अपहोल्स्टरी, हेडरेस्ट्सवर कढी केलेले इन्स्पायर लोगो आणि सोन्याच्या ॲक्सेंट्स यामुळं केबिन लक्झरी वाटते. यात थीम्ड मॅट्स, कुशन, रिअर विंडो सनशेड्स आणि लेदर की कव्हरचा समावेश आहे. पर्यायी एक्सेसरीज म्हणून स्कायलाइट इन्फिनिटी व्ह्यू ग्लास रूफ आणि वायरलेस इल्यूमिनेटेड सिल प्लेट्स उपलब्ध आहेत, ज्या एमजी डीलरशिपवर खरेदी करता येतील.
38 kWh बॅटरी
तांत्रिकदृष्ट्या, इन्स्पायर एडिशन स्टँडर्ड विंडसर ईवीप्रमाणेच आहे. यात 38 kWh बॅटरी आणि परमानेंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर आहे, जी फ्रंट व्हील्सला 134 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क देते. पूर्ण चार्जवर 331 किलोमीटरची रेंज मिळते, तर डीसी फास्ट चार्जिंगने 40 मिनिटांत 80% चार्ज होते. ही कार इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर म्हणून शहर आणि हायवेवरील ड्रायव्हिंगसाठी उत्तम आहे. एमजीनं या कारला लाइफटाइम बॅटरी वॉरंटी आणि 3-60 बायबॅक प्लॅनसह ऑफर केलं आहे. विंडसर ईवी इन्स्पायर एडिशन ही केवळ एक कार नसून, एमजीच्या ईव्ही यात्रेचा माइलस्टोन आहे. टाटा नेक्सॉन ईवी, महिंद्रा एक्सयूव्ह 400 सारख्या स्पर्धकांमध्ये ती आपली मजबूत स्थिती कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे. उत्साही ग्राहकांसाठी ही लिमिटेड एडिशन फेस्टिव्ह सीझनमध्ये परफेक्ट गिफ्ट आहे.
हे वाचलंत का :

