हैदराबाद : मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (MSIL) मंगळवारी 2025 ग्रँड विटारा ही नवीन SUV लॉंच केली, ज्याची सुरुवातीची किंमत 11.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या अपडेटेड वाहनात अधिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन व्हेरिएंट्सचा समावेश आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज आता स्टँडर्ड असतील. याशिवाय, नवीन डेल्टा+ स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळं ग्रँड विटाराच्या हायब्रिड पोर्टफोलिओचा विस्तार झाला आहे.
डेल्टा+ स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरिएंट
कंपनीनं नवीन डेल्टा+ स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरिएंट देखील लाँच केलंय, ज्याची किंमत 16.99 लाख रुपये आहे. हे नवीन डेल्टा+ व्हेरिएंट झेटा+, अल्फा+ आणि त्यांच्या पर्यायी ट्रिम्समध्ये सामील होईल. हायब्रिड मॉडेल्समध्ये पेट्रोल इंजिन आणि लिथियम-आयन बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक मोटरचं संयोजन आहे.
वैशिष्ट्ये
अपडेटेड ग्रँड विटाराचे सर्व मॉडेल्स आता E20 इंधन मानकांचे पालन करतात, असं कंपनीनं सांगितलं. स्टँडर्ड सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रामसह हिल होल्ड असिस्ट, फ्रंट आणि रियर डिस्क ब्रेक्ससह ABS आणि EBD, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि सर्व सीट्ससाठी 3-पॉइंट सीट बेल्ट्स यांचा समावेश आहे.
आतील सुधारणा
आतील भागात 8-वे पॉवर-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, 6AT व्हेरिएंट्समध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, मागील दरवाज्यांसाठी सनशेड्स, LED केबिन लॅम्प्स आणि PM 2.5 एअर प्युरिफायर डिस्प्ले यांचा समावेश आहे. अपडेटेड ग्रँड विटाराला नवीन R17 ॲलॉय व्हील्स आणि झेटा व अल्फा व्हेरिएंट्समध्ये अतिरिक्त सनरूफ पर्याय मिळाले आहेत.
पर्याय
ही SUV स्ट्रॉंग हायब्रिड, स्मार्ट हायब्रिड आणि ALLGRIP सेलेक्ट AWD अशा तीन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळं ती ग्राहक वर्गाला आकर्षित करते. प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये 9-इंच स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड सीट्स आणि क्लॅरियन साउंड सिस्टम यांचा समावेश आहे.
हे वाचलंत का :