हैदराबाद : लावा स्टॉर्म 5G डिसेंबर 2023 मध्ये भारतात लॉंच झाला होता. आता याच मालिकेत लावा स्टॉर्म प्ले 5G आणि स्टॉर्म लाइट 5G हे दोन नवीन स्मार्टफोन्स सामील होणार आहेत. कंपनीनं या नवीन स्मार्टफोन्सच्या लॉंचची तारीख जाहीर केली असून त्यांचे डिझाइन आणि कॅमेरा वैशिष्ट्यांचाही खुलासा केला आहे. लावा स्टॉर्म प्ले 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 प्रोसेसर असेल, तर स्टॉर्म लाइट 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट असेल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे.
Storm Lite - It's not Lite, It's lightning!
— Lava Mobiles (@LavaMobile) June 10, 2025
Launching on 13th June, 12 PM only on Amazon#StormLite #LavaMobiles #ProudlyIndian pic.twitter.com/nY3SfZfPdi
कधी होणार लॉंच?
लावा स्टॉर्म प्ले 5G आणि स्टॉर्म लाइट 5G हे स्मार्टफोन्स भारतात 13 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता लॉंच होणार आहेत, अशी माहिती Amazon मायक्रोसाइटवर उपलब्ध आहे. हे फोन्स लावा इंडिया ई-स्टोअर आणि Amazon या ई-कॉमर्स साइटवर खरेदीसाठी उपलब्ध असतील.
50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
लावा स्टॉर्म प्ले 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 प्रोसेसर, LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेज असेल, असं यापूर्वीच स्पष्ट झालं आहे. आता Amazon मायक्रोसाइटवरून समजलं आहे की, स्टॉर्म लाइट 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट असेल. कंपनीच्या मते, स्टॉर्म लाइट 5G हा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेटसह येईल, तर स्टॉर्म प्ले 5G हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो मीडियाटेक डायमेन्सिटी 7060 प्रोसेसरसह येईल. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल.
कसं आहे डिझाइन
डिझाइनच्या बाबतीत, लावा स्टॉर्म प्ले 5G च्या मागील पॅनलवर वरच्या बाजूला गूगल पिक्सेल कॅमेरा बारसारखी थोडी उंचावलेली आडवी पट्टी दिसते. यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर्स डाव्या कोपऱ्यात उभ्या रीतीनं ठेवलेले आहेत, त्यापैकी दुसरा सेन्सर या पट्टीत आहे. याच्या शेजारी एक LED फ्लॅश युनिट आहे आणि हा फोन निळ्या रंगात दाखवण्यात आला आहे. दुसरीकडं, लावा स्टॉर्म लाइट 5G सोनेरी रंगात दिसतो, ज्यामध्ये गोलाकार कडा असलेले चौकोनी रिअर कॅमेरा मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये दोन कॅमेरा स्लॉट्स आणि एक LED फ्लॅश युनिट आहे. लावा स्टॉर्म 5G मध्ये यापूर्वी मीडियाटेक डायमेन्सिटी 6080 प्रोसेसर होता, तर लावा शार्क 5G मध्ये युनिसॉक T765 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरीसह भारतात लॉंच झाला आहे.
हे वाचलंत का :