ETV Bharat / technology

लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टा भारतात लॉंच; मर्सिडीज जी-वैगनला टक्कर - LAND ROVER DEFENDER

लँड रोव्हरनं त्यांची सर्वात शक्तिशाली डिफेंडर ऑक्टा भारतात लाँच केली आहे, ज्याची किंमत 2.59 कोटी रुपयांपासून सुरू होते.

DEFENDER OCTA LAUNCHED IN INDIA  डिफेंडर ऑक्टा भारतात लाँच  DEFENDER OCTA  लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टा
लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टा (Land Rover)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 5:25 PM IST

2 Min Read

हैदराबाद : भारतीय बाजारपेठेत मर्सिडीज जी-वैगनला टक्कर देण्यासाठी एक नवीन एसयूव्ही दाखल झाली आहे, ती म्हणजे लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टा. लैंड रोव्हरनं बऱ्याच प्रतीक्षेनंतर डिफेंडर ऑक्टा ही सुपर-एसयूव्ही भारतात सादर केली आहे, ज्यामुळं या सेगमेंटमध्ये अधिक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ही एसयूव्ही ऑक्टा आणि ऑक्टा एडिशन वन अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. डिफेंडर ऑक्टाची एक्स-शोरूम किंमत 2.59 कोटी रुपये आहे, तर ऑक्टा एडिशन वनची एक्स-शोरूम किंमत 2.79 कोटी रुपये आहे.

लॉंचपूर्वीच सेल आउट
डिफेंडर ऑक्टा ही लैंड रोव्हरची सर्वात शक्तिशाली एसयूव्ही आहे आणि ती केवळ पाच-दरवाजांच्या ‘110’ बॉडी स्टाइलमध्ये सादर करण्यात आली आहे. तिचं एकूण वजन 2.5 टन आहे, तरीही ती उच्च गती आणि ऑफ-रोडिंगसाठी जबरदस्त आहे. कंपनीनं जुलै 2024 मध्ये तिची बुकिंग सुरू केली होती आणि विशेष म्हणजे पहिल्या बॅचमधील सर्व युनिट्स लॉंचपूर्वीच विकल्या गेल्या आहेत. त्यामुळं या शक्तिशाली एसयूव्हीसाठी भारतीयांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.

शानदार डिझाइन आणि खास फीचर्स
लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टामध्ये अनेक खास स्टाइलिंग एलिमेंट्स जोडले आहेत, ज्यामुळं ती अधिक आकर्षक दिसते. एडिशन वन प्रकार फेरो ग्रीन स्पेशल पेंट आणि कार्बन फायबर एक्सेंट्ससह सादर करण्यात आला आहे. या शक्तिशाली एसयूव्हीमध्ये नवीन ग्रिल, नवीन रियर बंपर, रुंद व्हील आर्च आणि 4 एग्जॉस्ट आउटलेट्स देण्यात आले आहेत. यासोबतच, ॲल्युमिनियम अलॉय अंडरबॉडी प्रोटेक्शनमुळं ती अधिक मजबूत बनते. इंटीरियरमध्ये स्टँडर्ड डिफेंडरसारखेच लेआउट आहे, परंतु यात परफॉर्मेंस सीट्स देण्यात आल्या आहेत. त्या लेदर आणि फॅब्रिक ऑप्शनमध्ये उपलब्ध असून स्टँडर्ड सीट्सपेक्षा 30 टक्के हलक्या आहेत.

दमदार इंजिन आणि जबरदस्त परफॉर्मेंस
लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टाच्या परफॉर्मेंसबद्दल बोलायचं झाल्यास, सर्वात खास गोष्ट म्हणजे तिचं इंजिन. या एसयूव्हीमध्ये 4.4-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन आहे, जे 626 बीएचपीची पावर आणि 750 न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करतं. विशेष म्हणजे डायनॅमिक लॉंच मोडमध्ये ते 800 एनएम पर्यंत वाढू शकतं. या दमदार इंजिनमुळं डिफेंडर ऑक्टा केवळ 4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडते आणि ती आतापर्यंतची सर्वात वेगवान डिफेंडर ठरते.

मजबूत सस्पेंशन आणि ऑफ-रोड क्षमता
डिफेंडर तिच्या ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते. या नवीन लैंड रोव्हर डिफेंडर ऑक्टामध्ये उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभवासाठी 6D डायनॅमिक्स सस्पेंशन देण्यात आले आहे, जे सेमी-ॲक्टिव्ह डॅम्पर्सचा वापर करतात. याव्यतिरिक्त, यात 400 मिमीचं डिस्क ब्रेक्स आणि ब्रेम्बो कॅलिपर्स बसवलेले आहेत, जे तिची ब्रेकिंग परफॉर्मेंस शानदार बनवतात. तिची ग्राउंड क्लीयरन्स 28 मिमीनं वाढवण्यात आली असून आता ती 1 मीटरपर्यंत पाण्यात सहजपणे चालू शकते. यात ऑफ-रोड ड्राइव्ह मोड (Octa Mode) देण्यात आला आहे, ज्यामुळं कठीण रस्त्यांवर उत्तम नियंत्रण मिळवता येतं.

हे वाचलंत का :

  1. फॉक्सवॅगन टिगुआन आर लाइनसाठी प्री बुकिंग सुरू, स्पेसिफिकेशन्स, रंग डिझाइन आलं समोर
  2. भारतातील ग्राहकसेवेत क्रांती : एआय चॅटबॉट्सवर 80% ग्राहकांचा भरोसा
  3. भारतात लाँच होण्यापूर्वी iQOO Z10 चे रंग पर्याय, डिझाइन टीझ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.