हैदराबाद : आयटेलनं मंगळवारी भारतात आपला नवीन स्मार्टफोन आयटेल झेनो 5G लाँच केला. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट आणि 4 जीबी रॅमसह येतो. यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. ड्युअल 5G सिम सपोर्टसह येणारा हा फोन आयटेलच्या AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, ज्यात Aivana नावाचं AI व्हॉइस असिस्टंट समाविष्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन पाच वर्षांपर्यंत लॅग-फ्री अनुभव देईल.
The all-new ZENO 5G has finally landed in the Zeno Universe 💫
— itel India (@itel_india) June 10, 2025
We're talking lightning-fast 5G speed and top-notch durability with IP54 water & dust protection because life (and adventures!) happens. But that's not all!! The real magic begins with our very own AI voice… pic.twitter.com/w9YjW153F3
आयटेल झेनो 5G किंमत, रंग पर्याय आणि उपलब्धता
आयटेल झेनो 5G ची भारतातील किंमत 4 जीबी + 128 जीबी व्हेरिएंटसाठी 10,299 रुपये आहे. हा फोन सध्या फक्त Amazon वर उपलब्ध आहे, जिथं ग्राहकांना 1,000 रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळेल. हा फोन कॅल्क्स टायटॅनियम, शॅडो ब्लॅक आणि वेव्ह ग्रीन या रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसंच, खरेदीच्या पहिल्या 100 दिवसांमध्ये मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सेवा उपलब्ध आहे.
आयटेल झेनो 5G ची वैशिष्ट्ये
हा स्मार्टफोन 6.67-इंच HD+ (720x1,612 पिक्सेल) IPS डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे. यात पांडा MN228 ग्लास प्रोटेक्शन आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 SoC, 4 जीबी LPDDR4X रॅम आणि 128 जीबी UFS 2.2 स्टोरेज आहे. व्हर्च्युअल रॅमद्वारे 4 जीबीपर्यंत रॅम वाढवता येतं आणि मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येतं. हा फोन अँड्रॉइड 14 वर कार्यरत आहे.
कॅमेरा आणि AI वैशिष्ट्ये
आयटेल झेनो 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा (f/1.6 अपर्चर) आणि लाइट सेन्सर आहे, जो 2K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यात Ask AI आणि Aivana AI व्हॉइस असिस्टंटसारखी AI वैशिष्ट्ये आहेत.
बॅटरी आणि इतर वैशिष्ट्ये
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट आहे. यात IP54 रेटिंगसह डस्ट आणि स्प्लॅश-प्रतिरोधक बिल्ड, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, IR ब्लास्टर, ड्युअल नॅनो सिम, 5G, 4G, ब्लूटूथ, वाय-फाय, GPS आणि USB टाइप-C पोर्ट यासारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. फोनची जाडी 7.8 मिमी आहे.
हे वाचलंत का :