हैदराबाद : शोमीनं भारतात त्यांचा नवीन स्वस्त स्मार्टफोन Redmi A5 लाँच केला आहे. यात 6.88-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 32MP AI ड्युअल कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. IP52 रेटिंगसह टिकाऊ, हा फोन Android 15 वर चालतो. तसंच यात 2TB पर्यंत स्टोरेज वाढवता येतं. दुसरीकडं, itel A95 देखील लाँच झाला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5,000 mAh बॅटरी आणि Ask AI टूल आहे. Redmi A5 ची किंमत 6,499 पासून सुरू होते, तर itel A95 ची 9,599 पासून सुरू होतेय, दोन्ही फोन बजेट सेगमेंटमध्ये स्पर्धा करताय.
itel A95 vs Redmi A5
किंमत आणि प्रकार
tel A95 | Redmi A5 | |
किंमत | 4GB + 64GB: 9,599 6GB+128GB: 9,999 | 3GB + 64GB: 6,499 4GB + 128GB: 7,499 |
रंग पर्याय | काळा, सोनेरी आणि निळा रंग | जैसलमेर गोल्ड, जस्ट ब्लॅक, पॉन्डिचेरी ब्लू |
उपलब्धता | अधिकृत, किरकोळ आणि ऑनलाइन स्टोअर्स | Mi वेबसाइट, Amazon, Flipkart, ऑफलाइन स्टोअर्स |
विश्लेषण
Redmi A5, tel A95 पेक्षा स्वस्त आहे. Redmi A5च्या बेस व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे, तर itel A95 ची किंमत 9,599 आहे. Redmi A5 चा स्मार्टफोन (4GB + 128GB) देखील itel A95 च्या बेस मॉडेलपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळं Redmi A5 किंमतीच्या बाबतीत अधिक चांगला आहे.
डिस्प्ले
tel A95 | Redmi A5 | |
आकार | 6.67-इंच IPS LCD | 6.88-इंच Dot Drop Display |
रिफ्रेश रेट | 90Hz | 120Hz |
टच सॅम्पपलिंग रेट | 240Hz | 240Hz पर्यंत |
चमक (Brightness) | 262 PPI | 600 निट्स (कमाल) |
प्रमाणपत्रे | - | ट्रिपल TÜV Rheinland |
रिझोल्यूशन | - | HD+ |
विश्लेषण
Redmi A5 चा डिस्प्ले (6.88-इंच विरुद्ध 6.67-इंच) tel A95 पेक्षा मोठा आहे. त्याचा रिफ्रेश रेट देखील जास्त आहे (120Hz विरुद्ध 90Hz), ज्यामुळं स्क्रोलिंग आणि ॲनिमेशन सोपं होतं. यात डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी प्रमाणपत्रे आणि उच्च टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे, ज्यामुळं गेमिंग आणि टच इंटरॅक्शनसाठी हा फोन उत्तम आहे. itel A95 च्या डिस्प्ले तपशील कमी सर्वसमावेशक आहेत, परंतु त्याचा 90Hz रिफ्रेश रेट किंमतीनुसार चांगला आहे.
कामगिरी
tel A95 | Redmi A5 | |
चिपसेट | Mediatek6300 | ऑक्टा-कोर प्रोसेसर |
रॅम प्रकार | 4GB, 6GB | 3GB, 4GB |
स्टोरेज प्रकार | 64GB, 128GB | 64GB, 128GB (2TB पर्यंत वाढवता येतो) |
ऑपरेटिंग सिस्टम | Android 14 | Android 15 |
विश्लेषण
Redmi A5 नवीन Android 15 वर चालते, तर itel A95 Android 14 वर चालतो. Redmi A5 मध्ये 2TB पर्यंत स्टोरेजचा विस्तार देखील करता येतो, ज्यामुळं अधिक स्टोरेज हवं वापरकर्त्यांना त्याचा फायदा होतो. मात्र, itel A95 जास्त रॅम पर्याय (6GB) देतं, ज्यामुळं मल्टिटास्किंगसाठी ते उत्तम असू शकतं. itel A95 मधील MediaTek 6300 हा बजेट चिपसेट आहे, परंतु Redmi A5 च्या प्रोसेसरबद्दल अधिक तपशील नसल्यानं दोघांच्या कामची तुलना करणं कठीण आहे.
कॅमेरा
itel A95 | Redmi A5 | |
मागील कॅमेरा | 50MP मुख्य कॅमेरा | 32MP AI ड्युअल कॅमेरा |
पुढील कॅमेरा | 8MP | 8MP |
व्हिडिओ रेकॉर्डिंग | - | 1080p (कमाल रिझोल्यूशन) |
अतिरिक्त वैशिष्ट्ये | - | फिल्म फिल्टर्स |
विश्लेषण
itel A95 चा 50MP मुख्य कॅमेरा Redmi A5 च्या 32MP ड्युअल कॅमेऱ्यापेक्षा जास्त रिझोल्यूशनचा आहे, ज्यामुळं फोटोंमध्ये अधिक तपशील मिळू शकतात. तथापि, Redmi A5 चा ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये AIची सुविधा मिळतेय. दोन्ही फोन्समध्ये सेल्फीसाठी समान 8MP कॅमेरे दिले आहेत.
बॅटरी आणि टिकाऊपणा
itel A95 | Redmi A5 | |
बॅटरी | 5,000 mAh | 5,200mAh |
रेटिंग | IP54 (धूळ आणि पाण्यापासून संरक्षण) | IP52 (धूळ आणि पाण्यापासून संरक्षण) |
विश्लेषण
itel A95 मध्ये 5,000 mAh बॅटरी दिलेली आहे. त्यामुळं चार्जिंगसाठी वापरकर्त्यांना वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासत नाही. Redmi A5 ची बॅटरी क्षमता 5,200mAh आहे. itel A95 ला IP54 रेटिंग आहे, जे Redmi A5 च्या IP52 पेक्षा किंचित चांगलं आहे. ज्यामुळं त्याला पाण्यापासून थोडं अधिक संरक्षण मिळतं.
अतिरिक्त वैशिष्ट्ये
itel A95 | Redmi A5 | |
AI वैशिष्ट्ये | अंगभूत Ask AI टूल (व्याकरण तपासणी, मजकूर निर्मिती, मजकूर शोध) | AI चेहरा अनलॉक, AI कॅमेरा |
सुरक्षा | - | साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, AI चेहरा अनलॉक |
कनेक्टिव्हिटी | ड्युअल सिम | 4G/5G ड्युअल बँड, ब्लूटूथ, 3.5mm हेडफोन जॅक |
ऑडिओ | - | 150% व्हॉल्यूम बूस्ट, 3.5mm हेडफोन जॅक |
सॉफ्टवेअर अपडेट | - | 2 वर्षांचे OS अद्यतने, 4 वर्षांचे सुरक्षा पॅचेस |
विश्लेषण
itel A95 चे Ask AI टूल एक चांगलं वैशिष्ट्य आहे, जे व्याकरण तपासणी आणि मजकूर निर्मिती करू करतं. त्यामुळं विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. Redmi A5 5G फिंगरप्रिंट सेन्सर, दीर्घकालीन सॉफ्टवेअर समर्थन (2 वर्षांचे OS अपडेट + 4 वर्षांचे सुरक्षा पॅचेस) यासह अधिक सर्वसमावेशक पॅकेज प्रदान करतं.
itel A95
उच्च-रिझोल्यूशन कॅमेरा (50MP), चांगली बॅटरी लाइफ (5,000 mAh), आणि उत्पादकता-केंद्रित AI टूल्स हवे असलेल्या वापरकर्त्यांसाठी उत्तम पर्याय आहे. हा फोन थोडा महाग असला तरी यात मल्टिटास्किंगसाठी जास्त रॅम पर्याय आहे.
Redmi A5
स्मार्टफोनचा मोठा डिस्प्ले (120Hz), 5G कनेक्टिव्हिटी आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेटसह येतोय. हा स्मार्टफोन स्वस्तात मस्त आहे.
जर तुम्हाला उच्च-रिझोल्यूशन कॅमेरा (50MP), 5,000 mAh बॅटरी आणि AI टूल्स, मल्टिटास्किंगसाठी जास्त रॅम असलेला बजेट फोन हवा असेल तर itel A95 घेण्याचा विचार करु शकता. जर तुम्हाला स्वस्त फोन हवा असेल ज्यामध्ये मोठा 120Hz डिस्प्ले, 5G समर्थन, दीर्घकालीन सॉफ्टवेअर अपडेट, 2TB पर्यंत स्टोरेज विस्तार हवा असेल तर तुम्ही Redmi A5 चा विचार करू शकता.
हे वाचलंत का :