हैदराबाद : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळानं (IRCTC) आपली नवीनतम नवोन्मेषी मोबाइल ॲप्लिकेशन, स्वारेल, सादर केलं आहे. हे ॲप रेल्वेशी संबंधित जवळपास सर्व सेवांना एका डिजिटल व्यासपीठावर एकत्र आणतं. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स (CRIS) द्वारे विकसित, हे ॲप सध्या चाचणी टप्प्यात (व्हर्जन v127) असून अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तिकीट बुकिंगपासून ते थेट ट्रेन ट्रॅकिंगपर्यंत आणि पर्यटन पॅकेजेसपासून ट्रेनमधील जेवणाच्या ऑर्डरपर्यंत, स्वारेल एक सर्वसमावेशक आणि सुलभ प्रवास अनुभव प्रदान करतं.
मुख्य वैशिष्ट्ये:
'स्वारेल ॲप'ला भारतीय रेल्वेचं “सुपरॲप” असंही संबोधलं जातं, अनेक प्रवासी-केंद्रित सेवांचं यात एकत्रीकरण होतंय. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- आरक्षित आणि अनारक्षित तिकिटांचं बुकिंग
- प्लॅटफॉर्म तिकिटांची खरेदी
- पार्सल आणि मालवाहतूक सेवांबद्दल माहिती
- थेट ट्रेन स्थिती आणि PNR अपडेट्स
- ट्रेनमधील जेवण वितरण सेवा
- रेल मददद्वारे तक्रार नोंदणी आणि निराकरण
ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध
स्वारेल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. यात सिंगल साइन-ऑन (SSO) सुविधा आहे, ज्यामुळं वापरकर्ते एकाच लॉगिनद्वारे सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात. विद्यमान IRCTC रेल कनेक्ट किंवा UTS ॲप वापरकर्ते त्यांच्या सध्याच्या लॉगिन क्रेडेन्शियल्ससह ॲप वापरू शकतात, तर नवीन वापरकर्ते सहजपणे साइन अप करू शकतात.
स्वारेल ॲपचा कसा वापर करावा
- गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून स्वारेल ॲप डाउनलोड करा.
- विद्यमान IRCTC रेल कनेक्ट किंवा UTS वापरकर्ते त्यांच्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करू शकतात.
- नवीन वापरकर्ते ॲपवर साइन अप करू शकतात.
हे वाचलंत का :
- OnePlus Ace 5 Ultra : 144 Hz डिस्प्लेसह गेमिंग फ्लॅगशिप फोन लवकरच करतोय एंट्री
- कुटुंबासाठी सर्वोत्तम ! 2025 मधील भारतातील टॉप 10 बजेट फ्रेंडली फॅमिली कार, तुमच्यासाठी ठरणार फायदेशीर
- Ola S1 Pro vs Ather 450X : कोणतं इलेक्ट्रिक स्कूटर आहे तुमच्यासाठी योग्य?
- 2025 Suzuki Avenis भारतात लाँच; किंमत आणि अपडेट्स जाणून घ्या