हैदराबाद : iQOO नं अखेरीस आपल्या Z10 टर्बो मालिकेची लॉंच तारीख जाहीर केली आहे. व्हिवोचा हा सब-ब्रँड 28 एप्रिलला iQOO Z10 टर्बो आणि iQOO Z10 टर्बो प्रो स्मार्टफोन्स सादर करणार आहे. Weibo वर शेअर केलेल्या टीझरमध्ये या फोन्सचे रंग आणि डिझाइन दिसत आहे. iQOO Z10 टर्बो मध्ये 7,620mAh बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 चिपसेट असेल, तर iQOO Z10 टर्बो प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जनरल 4 SoC असेल.
ड्युअल कॅमेरा सेटअप
लॉंच इव्हेंट 28 एप्रिलला संध्याकाळी 7:00 वाजता (भारतीय वेळेनुसार दुपारी 4:30) चीनमध्ये होणार आहे. iQOO नं शेअर केलेल्या अधिकृत प्रतिमांमध्ये Z10 टर्बो स्टार्री स्काय ब्लॅक, डेझर्ट, बर्निंग ऑरेंज आणि क्लाऊड सी व्हाइट रंगांमध्ये दिसतो. यामध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ही मालिका चीनमध्ये CNY 2,500 (अंदाजे 30,000 भारतीय) किंमतीपासून सुरू होईल.
iQOO Z10 टर्बो मालिकेच्या बॅटरी तपशील
टीझर्सनुसार, iQOO Z10 टर्बो प्रो मध्ये 7,000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग असेल. यामुळं बॅटरी 15 मिनिटांत 0 ते 50% आणि 33 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. हा फोन 8.09 मिमी जाड आणि 206 ग्रॅम वजनाचा आहे. दुसरीकडं, iQOO Z10 टर्बो मध्ये 7,620mAh बॅटरी आणि 90W चार्जिंग असेल.
गेमिंगसाठी iQOO ची स्वतःची Q1 चिप
iQOO Z10 टर्बो मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8400 SoC असेल, तर Z10 टर्बो प्रो मध्ये स्नॅपड्रॅगन 8s जनरल 4 SoC असेल. दोन्ही मॉडेल्समध्ये गेमिंगसाठी iQOO ची स्वतःची Q1 चिप असेल. iQOO नं व्हिवोच्या अधिकृत वेबसाइट, आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर Z10 टर्बो मालिकेसाठी प्री-रिझर्व्हेशन सुरू केलं आहे.
iQOO Z10 टर्बो प्रो चे संभाव्य वैशिष्ट्ये
iQOO Z10 टर्बो प्रो मध्ये 6.78-इंच 1.5K OLED डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट असेल. यात 50-मेगापिक्सेल मुख्य सेन्सर आणि 8-मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सेल कॅमेरा मिळू शकतो.
हे वाचलंत का :