हैदराबाद : मे 2024 मध्ये भारतात सादर झालेल्या इन्फिनिक्स जीटी 20 प्रोचा उत्तराधिकारी म्हणून इन्फिनिक्स जीटी 30 प्रो लवकरच लाँच होऊ शकतो. कंपनीनं अद्याप जीटी 30 प्रो बद्दल काहीही पुष्टी केलेली नाही, परंतु अनेक टिपस्टर्सनी या हँडसेटची वैशिष्ट्ये आणि संभाव्य किंमत उघड केली आहे. स्मार्टफोनच्या रॅम आणि स्टोरेज पर्याय, डिस्प्ले, चिपसेट, कॅमेरा, बॅटरी आणि चार्जिंगशी संबंधित सर्व तपशील लीक झाले आहेत. Infinix GT 30 Pro चे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे गेमिंग ट्रिगर बटण आणि 144Hz AMOLED डिस्प्ले.
Exclusive: Here’s your first look at the upcoming Infinix GT 30 Pro through concept renders. The final design is expected to be quite similar. The phone will offer segment-first gaming capabilities.
— Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) May 14, 2025
I can confirm it’s launching soon in India! So, if you're looking for a gaming… pic.twitter.com/l6EckXQQ8Z
इन्फिनिक्स जीटी 30 प्रो वैशिष्ट्ये (लीक)
टिपस्टर सुधांशू अंभोरे (@Sudhanshu1414) आणि संजू चौधरी यांच्या एक्स-पोस्टनुसार, Infinix GT 30 Pro मध्ये MediaTek Dimensity 8350 Ultimate SoC असू शकतं. फोनमध्ये LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेज असण्याची अपेक्षा आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित XOS 15 स्किनसह येण्याची शक्यता आहे.
Infinix GT 30 Pro launching soon in India 🇮🇳
— Sanju Choudhary (@saaaanjjjuuu) May 14, 2025
- 6.x" 1.5k 144hz flat oled
- mediatek 8350
- 5500mah + 67w
- 108mp ois + 8 uw
- in-built gaming triggers
- under 25k
thoughts? pic.twitter.com/RmnIUUId59
6.78-इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले
टिपस्टरनं असंही उघड केलं की Infinix GT 30 Pro मध्ये 1,224x2,720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, हँडसेटमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर आणि 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर असेल. फोनमध्ये 5,500mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 67W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
किती असेल किंमत
दुसऱ्या एका X पोस्टमध्ये, Anvin (@ZionsAnvin) नं दावा केला आहे की Infinix GT 30 Pro फोन 8GB RAM + 256GB स्टोरेज, 12GB + 256GB आणि 12GB + 512GB प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तसंच, फोनच्या किंमतीबद्दल, असा अंदाज आहे की Infinix GT 30 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असेल. Infinix GT 30 Pro च्या लाँचिंगची आणि त्याच्या वैशिष्ट्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झाली नाहीय, परंतु लीक झालेल्या माहितीनुसार गेमिंग आणि कामगिरीच्या बाबतीत हा फोन एक शक्तिशाली पर्याय आहे.
हे वाचलंत का :