हैदराबाद : हुआवेनं सोमवारी दोन नवीन लॅपटॉप मॉडेल्स, मेटबुक फोल्ड आणि मेटबुक प्रो, लॉंच केले.हे लॅपटॉप त्यांच्या हार्मनी ऑपरेटिंग सिस्टमवर (हार्मनीओएस 5) चालतात. या लॅपटॉप्सद्वारे कंपनी मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलसारख्या पाश्चिमात्य तंत्रज्ञान दिग्गजांना आव्हान देत आहे. अमेरिकेनं 2019 पासून हुआवेच्या तंत्रज्ञानाच्या प्रवेशावर निर्बंध लादले आहे. मात्र, कंपनीनं स्वतःची चिप्स आणि ऑपरेटिंग सिस्टम विकसित करण्यावर भर दिला आहे. मेटबुक फोल्ड आणि मेटबुक प्रो हे दोन्ही लॅपटॉप हार्मनीओएस 5 वर चालतात.
बेस मॉडेलला फिजिकल कीबोर्ड नाही
कंपनीनं लॅपटॉपच्या प्रोटोटाइप्सवर 2021 मध्ये काम सुरू केलं होतं. "हार्मनी लॅपटॉप जगाला एक नवीन पर्याय देत आहे," असं हुआवेच्या कन्झ्युमर बिझनेस ग्रुपचे प्रमुख यू चेंगडाँग यांनी लाइव्हस्ट्रीम लॉंच इव्हेंटमध्ये सांगितलं.मेटबुक फोल्डच्या बेस मॉडेलला फिजिकल कीबोर्ड नाहीय. या लॅपटॉप पूर्ण उघडल्यास 18 इंचांचा ओएलईडी डबल स्क्रीन मिळतो. याची किंमत 23,999 युआन (अंदाजे 3,328 डॉलर) आहे. मेटबुक प्रो मॉडेलची किंमत किंमत 7,999 युआनपासून सुरू होतेय.
150 हून अधिक ॲप्स ऑफर
हुआवेनुसार, हार्मनीओएस लॅपटॉप 150 हून अधिक ॲप्स ऑफर करतंय, ज्यात किंगसॉफ्टचा डब्ल्यूपीएस ऑफिस (मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा पर्याय) आणि मेइटू श्यू श्यू फोटो एडिटिंग ॲपचा समावेश आहे. हुआवेनं नव्या लॅपटॉप्समध्ये वापरलेल्या प्रोसेसिंग चिपबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र, नव्या चिपसेट तंत्रज्ञानामुळं लॅपटॉपच्या किंमती तुलनेनं जास्त असल्याचं कंपनीने सांगितलं. गेल्या वर्षी अमेरिकेनं इंटेल आणि क्वालकॉम कंपन्यांना हुआवेला लॅपटॉप आणि हँडसेटसाठी चिप्स पुरवण्याचे परवाने रद्द केले होते.
हे वाचलंत का :
- स्नॅपड्रॅगन एक्स सिरीज चिपसेटसह HP OmniBook 5 Series AI PC लाँच: किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या..
- वनप्लस 13s भारतात 5 जूनला होणार लॉंच; लॉंचपूर्वीच वैशिष्ट्ये, रंगाची माहिती जाहीर
- भारतातील सर्वोत्तम फॅमिली कार्स 2025 : सुझुकी अर्टिगा, टाटा पंच, किआ कॅरेन्स कुटुंबासाठी आरामदायी, सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय