ETV Bharat / technology

HP Omnistudio X ऑल इन वन पीसी भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये.. - HP OMNISTUDIO X LAUNCHED

एचपीनं भारतात ओम्नी स्टुडिओ एक्स ऑल-इन-वन पीसी लाँच केला. इंटेल कोर अल्ट्रा 7, 32GB रॅम, 31.5-इंच 4K डिस्प्ले, वाय फाय 7 सह हा पीसी येतोय.

HP Omnistudio X
HP Omnistudio X (HP)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : May 22, 2025 at 11:00 AM IST

Updated : May 22, 2025 at 12:12 PM IST

2 Min Read

हैदराबाद : HP नं बुधवारी भारतात आपला नवीन ऑल इन वन (AIO) पीसी, OmniStudio X लाँच केला आहे. हा शक्तिशाली पीसी इंटेल कोर अल्ट्रा 7 प्रोसेसरसह येतो, ज्यामध्ये आर्क ग्राफिक्स आणि 32 जीबी रॅम तसंच 1 टीबी एसएसडी स्टोरेज आहे. यात इंटेल एआय बूस्ट एनपीयू आहे, ज्यामुळं एकूण 47 टेरा ऑपरेशन्स पर सेकंद (TOPS) ची संगणकीय शक्ती मिळते. यात 31.5 इंचाचा 4K रिझोल्यूशन IPS डिस्प्ले, ड्युअल स्पीकर्स, 5-मेगापिक्सेल इन्फ्रारेड वेबकॅम आणि वाय-फाय 7 कनेक्टिव्हिटी आहे.

HP Omnistudio X
HP Omnistudio X (HP)

HP OmniStudio X किंमत
OmniStudio X ऑल-इन-वन पीसी भारतात 1,79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला आहे. हा पीसी एका मेटिअर सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. तो एचपी ऑनलाइन स्टोअर तसंच देशभरातील ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.

OmniStudio X वैशिष्ट्ये आणि तपशील
एचपी ओम्नी स्टुडिओ एक्समध्ये 31.5 इंचाचा 4K UHD (3,840 x 2,160 पिक्सेल) IPS अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. याचा ब्राइटनेस 500 निट्स आहे. यात 98% DCI-P3 रंगछटा कव्हरेज आणि 178-डिग्री व्ह्यूइंग अँगल्स आहेत. डीसी डिमिंग तंत्रज्ञानामुळं डिस्प्ले फ्लिकर-फ्री आहे, जे डायरेक्ट करंटद्वारे ब्राइटनेस नियंत्रित करतं. हा पीसी इंटेल कोर अल्ट्रा 7 258V प्रोसेसरद्वारे समर्थित आहे, ज्यामध्ये 8 कोर आणि 8 थ्रेड्स आहेत. इंटेल टर्बो बूस्ट तंत्रज्ञानामुळं याची बर्स्ट क्लॉक स्पीड 4.8GHz आहे. यात इंटेल आर्क ग्राफिक्स आणि एआय बूस्ट एनपीयू आहे, ज्यामुळं एकूण 47 TOPS ची संगणकीय शक्ती मिळते.

इथरनेट कनेक्टिव्हिटी पर्याय
यात 32 जीबी DDR5 रॅम आणि 512 जीबी PCIe Gen4 NVMe SSD स्टोरेज आहे. एचपी ओम्नी स्टुडिओ एक्स मध्ये 5-मेगापिक्सेल इन्फ्रारेड वेबकॅम आहे, जो टेम्पोरल नॉइज रिडक्शन आणि विंडोज हॅलो सपोर्टसह येतो. यात ड्युअल अॅरे डिजिटल मायक्रोफोन, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4 आणि इथरनेट कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. यात एक USB टाइप-C पोर्ट (डिस्प्लेपोर्ट 1.4 सपोर्टसह), दोन USB टाइप-A पोर्ट (10 Gbps सिग्नलिंग रेट), एक RJ45 पोर्ट, एक HDMI 2.1 पोर्ट आणि 3.5mm हेडफोन-मायक्रोफोन जॅक आहे. यात HDMI आउट पोर्ट देखील आहे, ज्यामुळं दुसरा मॉनिटर जोडता येऊ शकतो. हा पीसी ड्युअल 5W स्पीकर्ससह येतो, ज्यात DT:S X अल्ट्रा ऑडिओ आणि पॉली स्टुडिओ आहे.

हे वाचलंत का :

  1. Best Battery Smartphone : 2025 मधील 3 सर्वोत्तम बॅटरी स्मार्टफोन, जास्त काळ टिकणार बॅटरी
  2. निसान मायक्रा इलेक्ट्रिक अवतारात दाखल, 2025 मध्ये होणार होतेय लाँच
  3. 2025 मध्ये लॉंच होणार टाटाच्या 'या' टॉप 3 कार: स्टायलिश, आकर्षक वैशिष्ट्यांसह 500 किमी रेंज

Last Updated : May 22, 2025 at 12:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.