ETV Bharat / technology

स्नॅपड्रॅगन एक्स सिरीज चिपसेटसह HP OmniBook 5 Series AI PC लाँच: किंमत, वैशिष्ट्ये जाणून घ्या.. - HP OMNIBOOK 5 S

HP OmniBook 5 Series AI PC स्नॅपड्रॅगन एक्स सिरीज चिपसेटसह लॉंच झालीय. ही मालिका 14 -इंच आणि 16-इंच स्क्रीन आकाराच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

HP OmniBook 5 Series AI PC
HP OmniBook 5 Series AI PC (HP)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : May 20, 2025 at 10:47 AM IST

2 Min Read

हैदराबाद : एचपीनं Computex 2025 मध्ये सोमवारी आपली नवीन ऑम्नीबुक 5 मालिका लॉंच केली. हे एआय सक्षम पीसी स्नॅपड्रॅगन एक्स आणि स्नॅपड्रॅगन एक्स प्लस प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत.या मालिकेत न्यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे, जे 45 टेरा ऑपरेशन्स प्रति सेकंद (TOPS) ची संगणकीय शक्ती प्रदान करतं असा दावा कंपनीनं केला आहे. 14-इंच आणि 16-इंच OLED स्क्रीन आकारात हे पीसी मिळतील. एचपी ऑम्नीबुक 5 मालिका 5K किंवा दोन 4K बाह्य डिस्प्ले, 1080p इन्फ्रारेड (IR) कॅमेरा आणि एचपी फास्ट चार्ज तंत्रज्ञानाला समर्थन देते.

HP OmniBook 5 Series किंमत आणि उपलब्धता
एचपी ऑम्नीबुक 5 मालिकेत दोन मॉडेल्स आहेत. एचपी ऑम्नीबुक 5 ( 14 इंच) ची सुरुवातीची किंमत 799 $(अंदाजे रु. 68,000) आहे, ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन एक्स चिपसेट आहे. तर, एचपी ऑम्नीबुक 5 (16 इंच) ची सुरुवातीची किंमत 849$ (अंदाजे रु. 72,500) आहे. हे दोन्ही एआय पीसी जुलैपासून HP.com, Best Buy आणि Costco वर खरेदीसाठी उपलब्ध होतील. जूनमध् ग्राहक Amazon आणि Micro Centre वर एचपी ऑम्नीबुक 5 14 मॉडेल खरेदी करू शकतात. ही मालिका फक्त ग्लेशियर सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे.

HP OmniBook 5 Series वैशिष्ट्ये
एचपी ऑम्नीबुक 5 मालिका दोन डिस्प्ले आकारात उपलब्ध आहे — 14-इंच (ऑम्नीबुक 5 14) आणि 16-इंच (ऑम्नीबुक 5 16). दोन्ही मॉडेल्समध्ये 2K (1,920 x 1,200) OLED स्क्रीन आहे, ज्याचा कमाल ब्राइटनेस 300 निट्स आणि DCI-P3 रंग गॅमटचे 95 टक्के कव्हरेज आहे. या एआय पीसीमध्ये TUV+Eyesafe डिस्प्ले प्रमाणपत्रासह कमी ब्लू-लाइट उत्सर्जन आणि 0.02ms प्रतिसाद वेळ आहे. ग्राहक हे लॅपटॉप आठ-कोर स्नॅपड्रॅगन एक्स प्लस X1P-42-100 CPU सह खरेदी करू शकतात, ज्याची कमाल क्लॉक स्पीड 3.4GHz आहे. यात क्वालकॉम ॲड्रेनो GPU, 32GB LPDDR5x रॅम आणि 1TB PCIe Gen4 NVMe SSD स्टोरेज आहे. कंपनी ट्रस्टेड प्लॅटफॉर्म मॉड्यूल (Firmware TPM) सपोर्ट देखील देते.

Copilot+ क्षमता
एआय पीसी म्हणून, एचपी ऑम्नीबुक 5 मॉडेल्समध्ये Copilot+ क्षमता आणि समर्पित Copilot+ की आहे. यात Recall आणि Click-to-Do सारखी एआय-सक्षम वैशिष्ट्ये आहेत, जी सध्या प्रीव्ह्यू टप्प्यात आहेत. Windows Search आणि Cocreator in Paint मध्येही सुधारणा करण्यात आली आहे. एचपीनं यात HP AI Companion समाविष्ट केलं आहे, जे विश्लेषण, कार्यप्रदर्शन ऑप्टिमायझेशन ऑन-डिव्हाइस एआय टूल्स प्रदान करतं.

1080p फुल एचडी IR कॅमेरा
एचपी ऑम्नीबुक 5 14 आणि 16-इंच मॉडेल्समध्ये 1080p फुल एचडी IR कॅमेरा आहे, जो Windows Hello सपोर्ट आणि प्रायव्हसी शटरसह येतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ब्लूटूथ 5.3 आणि वाय-फाय 6E यांचा समावेश आहे, जे क्वालकॉम FastConnect 6900 मॉडेमद्वारे समर्थित आहेत. I/O पोर्ट्समध्ये दोन USB Type-C पोर्ट्स (DisplayPort 1.4a सपोर्टसह), एक USB Type-A पोर्ट आणि 3.5mm हेडफोन आणि मायक्रोफोन कॉम्बो जॅक यांचा समावेश आहे.

5K, 4K बाह्य डिस्प्लेला सपोर्ट
ऑम्नीबुक 5 मालिका 5K, 4K बाह्य डिस्प्लेला सपोर्ट करते. एचपी ऑडिओ बूस्ट 2.0, ड्युअल स्पीकर्स आणि दोन ॲम्प्लिफायर्ससह, सुधारित ऑडिओ स्पष्टता प्रदान करते आणि व्हिडिओ कॉलदरम्यान पार्श्वभूमीचा आवाज आपोआप बंद करण्यासाठी एआयचा वापर करतं. दोन्ही लॅपटॉपमध्ये 59Wh ट्रिपल-सेल लिथियम-आयन पॉलिमर बॅटरी आहे, जी 65W पॉवर ॲडॉप्टरद्वारे 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होऊ शकतं, असा दावा एचपीनं केला आहे.

हे वाचलंत का :

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.