ETV Bharat / technology

होंडाने लॉंच केल्या Honda CB350RS आणि Honda Hness CB350 च्या 2025 आवृत्त्या - HONDA CB350RS VERSIONS 2025

होंडानं Honda CB350RS आणि Honda Hness CB350 च्या आवृत्या लॉंच केल्या आहेत. नवीन रंग, अपडेटेड पावरट्रेनसह आकर्षक पर्याय, वैशिष्ट्ये आणि किंमतींबाबत जाणून घ्या...

Honda CB350RS
Honda CB350RS (Honda)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : April 5, 2025 at 1:33 PM IST

1 Min Read

हैदराबाद : होंडा मोटरसायकल्स अँड स्कूटर्स इंडिया (Honda Motorcycles and Scooters India) नं आपल्या लोकप्रिय बाइक CB350RS आणि Hness CB350 च्याआवृत्या लॉंच केल्या आहेत. या अपडेटेड आवृत्त्यांमध्ये नवीन रंग पर्यायांसह पावरट्रेनमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. या दोन्ही बाइक्सच्या वैशिष्ट्यांमुळं बाइकप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. चला तर मग, या नव्या बाइक्सची वैशिष्ट्ये, पावरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

CB350RS नवीन रंगसंगती आणि किंमत
नवीन होंडा CB350RS ही बाइक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात DLX आणि DLX प्रो प्रकाराचा समावेश आहे. DLX प्रकारात दोन नवीन रंग पर्याय आहेत: पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे. तर DLX प्रो प्रकारात मॅट अॅक्सिस ग्रे मेटॅलिक आणि रेबेल रेड मेटॅलिक हे दोन नवीन रंग जोडण्यात आलं आहेत. याशिवाय पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल डीप ग्राउंड ग्रे हे रंग आधीपासूनच उपलब्ध आहेत. या बाइकमध्ये फ्यूल टँक आणि साइड पॅनलवर नवीन डिझाइनचे डेकल्सही देण्यात आले आहेत. इंजिनच्या बाबतीत, यात 348.36cc, एअर-कूल्ड मोटर आहे, जी 21.78bhp ची कमाल शक्ती आणि 30Nm चा पीक टॉर्क निर्माण करतं. या नव्या CB350RS ची किंमत DLX प्रकारासाठी 2,15,500 रुपये आणि DLX प्रो प्रकारासाठी 2,18,850 रुपये आहे.

Honda CB350RS
Honda CB350RS (Honda)

Hness CB350 किंमत आणि वैशिष्ट्ये
नवीन होंडा Hness CB350 चं 2025 मॉडेल तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यात DLX, DLX Pro आणि DLX Pro Chrome चा समावेश आहे. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 2.10 लाख ते 2.15 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. पावरट्रेन म्हणून यात 348.36cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 20.78bhp ची कमाल शक्ती आणि 30Nm चा पीक टॉर्क निर्माण करतं.

Honda Hness CB350
Honda Hness CB350 (Honda)

हे वाचलंत का :

  1. भारतात ABS सह सर्वात स्वस्त दुचाकी : 1.20 लाखांपेक्षा कमी किंमतीत उत्तम पर्याय
  2. ओला इलेक्ट्रिक लॉंच करणार 12 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स, शानदार लूक आणि जास्त रेंजसह
  3. हायड्रोजनवर चालणारी नविन ह्युंदाई नेक्सो कार सादर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.