हैदराबाद : हिरो मोटोकॉर्पनं भारतात आपल्या लोकप्रिय करिझ्मा XMR 210 चे दोन नवे उच्च-स्तरीय व्हेरिएंट्स लॉंच केले आहेत. या बाइकमध्ये काही यांत्रिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. नव्या टॉप व्हेरिएंटची किंमत 2 लाख रुपये तर रेंज-टॉपिंग कॉम्बॅट एडिशनची किंमत 2.02 लाख रुपये (दोन्ही एक्स-शोरूम दिल्ली) आहे. दरम्यान, बेस व्हेरिएंटची किंमत 1.81 लाख रुपये (एक्स-शोरूम) कायम आहे. नव्या वैशिष्ट्यांसह आणि आकर्षक डिझाइनसह ही बाइक बाजारात लक्ष वेधून घेण्यास सज्ज आहे.
काय आहेत नविन फीचर
हिरो मोटोकॉर्पनं 2025 करिझ्मा XMR 210 मध्ये दोन नवे व्हेरिएंट्स सादर केले आहेत. या एक टॉप व्हेरिएंट असून दुसरं कॉम्बॅट एडिशन आहे. या दोन्ही मॉडेल्सना नवीन TFT रंगीत डिस्प्ले मिळाला आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनची सुविधा आहे.
210cc, लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिन
या डिस्प्लेवर रायडर्सना कॉल आणि SMS अलर्ट्स, वाहनाच्या बॅटरीची स्थिती आणि म्युझिक कंट्रोल यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल. याशिवाय, टॉप व्हेरिएंट आणि कॉम्बॅट एडिशनमध्ये USD फ्रंट फॉर्क्स देण्यात आले आहेत, जे राइडिंग अनुभवाला आणखी सुधारतील. कॉम्बॅट एडिशनमध्ये राखाडी आणि काळ्या रंगाची थीम असून पिवळ्या हायलाइट्समुळं ही बाइक स्पोर्टी आणि आकर्षक दिसतेय. करिझ्मा XMR मध्ये 210cc, लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिन आहे, जे 9,250rpm वर 25bhp आणि 7,250rpm वर 20.4Nm टॉर्क निर्माण करतं.
हिरो मोटोकॉर्प आगामी लाँच
हिरो मोटोकॉर्प लवकरच भारतात करिझ्मा XMR 250 लाँच करण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी इटलीतील मिलान येथे झालेल्या EICMA मध्ये या बाईकचं जागतिक पदार्पण झालं होतं. या बाईकमध्ये 250 सीसी, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, DOHC इंजिन वापरलं आहे जे 30bhp चा पीक पॉवर आउटपुट आणि 25Nm चा कमाल टॉर्क निर्माण करतं.
हे वाचलत का :