हैदराबाद : हीरो मोटोकॉर्पनं आपली सर्वात लोकप्रिय बाइक, स्प्लेंडर प्लसची 2025 आवृत्ती लॉंच केली आहे. बाइकचं एकंदरीत डिझाइन जैसे थे आहे, परंतु कॉस्मेटिक आणि पॉवरट्रेनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हीरो स्प्लेंडर लाइनअपमध्ये स्प्लेंडर+, स्प्लेंडर+ XTEC आणि स्प्लेंडर+ XTEC 2.0 यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया 2025 हीरो स्प्लेंडर लाइनअपमध्ये काय नवीन आहे.
2025 हीरो स्प्लेंडर प्लस इंजिन आणि पॉवरट्रेन
हीरो स्प्लेंडर लाइनअपमध्ये यापूर्वीच्या मॉडेल्सप्रमाणेच इंजिन कायम आहे. तथापि, ते फेज II OBD-2B नियमांचं पालन करण्यासाठी सुधारित करण्यात आलं आहे. यात 97.2cc, एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर SOHC 2V इंजिन आहे, जे 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेलं आहे. हे इंजन 7.91 bhp कमाल पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करतं.
2025 हीरो स्प्लेंडर प्लस, अपडेट्स
2025 हीरो स्प्लेंडरचे डिझाइन यापूर्वीच्या मॉडेल्सप्रमाणेच आहे. तथापि, बाजूंना नवीन ग्राफिक्स देऊन त्याला स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. काही व्हेरिएंट्ससाठी सुधारित पिलियन ग्रॅब रेल आणि लगेज रॅक देखील देण्यात आले आहे.
2025 हीरो स्प्लेंडर प्लस, किंमत आणि प्रतिस्पर्धी
हीरो स्प्लेंडर प्लसमध्ये एकूण सहा व्हेरिएंट्स आहेत: स्प्लेंडर+ ड्रम ब्रेक, स्प्लेंडर+ i3, स्प्लेंडर+ i3S ब्लॅक अँड अॅक्सेंट, स्प्लेंडर+ XTEC ड्रम ब्रेक, स्प्लेंडर+ XTEC डिस्क ब्रेक आणि स्प्लेंडर+ XTEC 2.0 ड्रम ब्रेक. या लाइनअपची किंमत 79,096 रुपयांपासून सुरू होऊन 85,001 रुपयांपर्यंत आहे. भारतीय बाजारात हीरो स्प्लेंडर प्लसचा मुकाबला TVS स्टार सिटी प्लस, होंडा शाइन 100 आणि बजाज प्लॅटिना 100 यांच्याशी आहे.
हे वाचलंत का :