हैदराबाद : दिल्लीत बुधवारी उष्णतेच्या लाटेमुळं "यलो अलर्ट" जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, कमाल तापमान 40-41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअसवर गेलं आहे, जे सामान्यपेक्षा 5-7 अंशांनी जास्त आहे. देशभरात उष्णतेची लाट आणि दक्षिण, ईशान्य भारतात पावसाचा मिश्र प्रभाव दिसून येत आहे.
ऊष्ण लहर के लिए उपमंडलीय मौसम चेतावनी (09 अप्रैल, 2025)
— India Meteorological Department (@Indiametdept) April 8, 2025
Sub-Divisionwise Weather warning for Heat Wave (09 April, 2025)#imd #india #WeatherUpdate #heatwave #rajasthanheatwave #himachalpradeshheatwave #saurashtraheatwave #konkan #goa #gujaratheatwave #haryana #punjab… pic.twitter.com/2GHtsTpoMJ
दिल्लीत यलो अलर्ट
दिल्लीत बुधवारी उष्णतेच्या लाटेमुळं "यलो अलर्ट" जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) सांगितलं की, कमाल तापमान 40-41 अंश सेल्सिअस राहील. दिल्लीत मंगळवारी रात्रीचं किमान तापमान 25.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सामान्यपेक्षा 5-7 अंशांनी जास्त आहे. दिल्ली-एनसीआरमधील अनेक ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा 4-6 अंशांनी जास्त आहे. हवामान स्वच्छ राहील आणि दक्षिण-पूर्वेकडून 8 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. IMD नुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट तर बहुतांश भागात रात्री गरमीची परिस्थिती आहे.
देशभरातील उष्णतेची लाट
मंगळवारी मध्य आणि पश्चिम भारतात उष्णतेच्या लाटेनं झोडपलंय. राजस्थानच्या बाडमेर येथे सर्वाधिक 46.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, जे सामान्यपेक्षा 7.6 अंशांनी जास्त आहे. IMD नुसार, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 27 हवामान केंद्रांवर तापमान 43 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होतं, त्यापैकी 19 ठिकाणी उष्णता ते तीव्र उष्णतेची लाट होती. दिल्लीतील सफदरजंग (41 अंश सेल्सिअस) आणि अयानगर (40.4 अंश सेल्सिअस) येथेही उष्णतेची परिस्थिती होती. राजस्थानातील जैसलमेर (45 अंश सेल्सिअस), चित्तोडगड (44.5 अंश सेल्सिअस), बिकानेर (44.4 अंश सेल्सिअस) आणि श्री गंगानगर (44.2 अंश सेल्सिअस) येथे तापमान सामान्यपेक्षा 7-9 अंशांनी जास्त होते. गुजरातमध्ये सुरेंद्रनगर (44.8 अंश सेल्सिअस), राजकोट (44 अंश सेल्सिअस), अमरेली (43.8 अंश सेल्सिअस) आणि महुवा व कांडलामध्ये (43.4 अंश सेल्सिअस) तापमान नोदवलं गेलं. महाराष्ट्रात अकोला (44.1 अंश सेल्सिअस), नंदुरबार (43.5 अंश सेल्सिअस), जळगाव (43.3 अंश सेल्सिअस) आणि मध्य प्रदेशात गुना (43.4 अंश सेल्सिअस) आणि रतलाम (43.2 अंश सेल्सिअस) येथेही उष्णता होती. IMD च्या अंदाजानुसार, 10 एप्रिलपासून वायव्य भारतात आणि 11 एप्रिलपासून गुजरात, मध्य प्रदेशात उष्णतेपासून दिलासा मिळेल.
Weather Warning for 09th April 2025#imd #shorts #thunderstorm #rainfall #hailstorm #Heatwave @moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts pic.twitter.com/8MGzfkF9qI
— India Meteorological Department (@Indiametdept) April 8, 2025
IMD चा उष्णतेचा अंदाज
9 एप्रिल रोजी पश्चिम राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेची लाट अपेक्षित आहे. सौराष्ट्र आणि कच्छ, पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत 9 एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्णता राहील. पश्चिम उत्तर प्रदेश आणि विदर्भात 9 एप्रिल रोजी, तर मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 9-10 एप्रिल दरम्यान उष्णतेची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 9-10 एप्रिल दरम्यान रात्री गरम हवामान असेल , तर राजस्थान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 9 एप्रिल रोजी उष्ण आणि दमट हवामान अपेक्षित आहे.
Multi-Hazard Warning for 09 & 10 April, 2025
— India Meteorological Department (@Indiametdept) April 9, 2025
मल्टी-हज़ार्ड वॉर्निंग 09 और 10 अप्रैल, 2025 के लिए #imd #WeatherUpdate #mausam #thunderstorm #rainfall #hailstorm #heatwave #duststorm@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/WDMYyPOzaJ
दक्षिण आणि ईशान्य भारतात पाऊस
9 एप्रिल रोजी तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकल, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, केरळ आणि माहे, तेलंगणा आणि कर्नाटकात विजांचा कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी 40-50 किमी प्रतितास वेगानं वारे वाहन्याचा अंदाज आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात 9-12 एप्रिल दरम्यान असंच हवामान राहील. बिहारमध्ये 9 एप्रिल रोजी गारपीट होऊ शकते. असम आणि मेघालयात 9 आणि 10 एप्रिल रोजी, तर अरुणाचल प्रदेशात 10 एप्रिल रोजी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुजफ्फराबादमध्ये 9-11 एप्रिल दरम्यान हलका/मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे (40-50 किमी प्रतितास) अपेक्षित आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही 9-11 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडेल. वायव्य भारताच्या मैदानी भागात 10 एप्रिल रोजी हलका पाऊस तर जम्मू-काश्मीरमध्ये 9 एप्रिल रोजी गारपीट होण्याची शक्यता आहे.
FAQ
— India Meteorological Department (@Indiametdept) April 9, 2025
How does India Meteorological Department (IMD) co-ordinate with Central & State Disaster Managers for Heat Wave?#IMD #WeatherUpdate #mausam #heat #FAQ #HeatWave@moesgoi @DDNewslive @ndmaindia @airnewsalerts @DrJitendraSingh @PMOIndia @mygovindia @WMO pic.twitter.com/z8OfqAxiHw
काय असतो यलो अलर्ट
उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट हा भारतीय हवामान खात्यानं (IMD) जारी केलेला एक सतर्कतेचा संदेश असतो, जो मध्यम स्वरूपाच्या उच्च तापमानाची सूचना देतो. यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते, परंतु तो तात्काळ जीवघेणा नसतो. हा इशारा उष्णतेच्या लाटेची शक्यता दर्शवतो, जेव्हा तापमान सामान्यपेक्षा 4.5–6.4 अंश सेल्सिअसनं जास्त किंवा मैदानी भागात 40 अंशांपेक्षा अधिक असतं, तेव्हा वृद्ध आणि लहान मुलांसारख्या संवेदनशील गटांना डिहायड्रेशन किंवा उष्माघाताचा धोका असतो. हा इशारा सावधगिरी बाळगण्याचे, पाणी पित राहण्याचे, थेट सूर्यप्रकाश टाळण्याचे आणि संवेदनशील लोकांची काळजी घेण्याचे आवाहन करतो. स्थानिक प्रशासनाला परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास आणि पावले उचलण्यास या अलर्ट प्रोत्साहन देतो.
उष्णतेच्या लाटेपासून स्वतःची काळजी कशी घ्यावी?
- पाणी आणि हायड्रेशन : दिवसभर भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ओआरएस सारखे हायड्रेटिंग पेय घ्या. अल्कोहोल आणि कॅफिन टाळा, कारण ते डिहायड्रेशन वाढवतात.
- हलके कपड वापरा : सैल, हलक्या रंगाचे आणि सूती कपडे घाला. डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
- थंड ठिकाणी बसावं : शक्यतो सावलीत राहा. दुपारी 12 ते 3 दरम्यान घराबाहेर जाणे टाळा, कारण तेव्हा उष्णता तीव्र असते. थंड पाण्यानं आंघोळ करा पंखा/एसीचा वापर करा.
- पाणीदार फळे खा : हलके, ताजे आणि पाणीदार फळे खा, जसं की टरबूज, संत्री, काकडी. जड, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
- लक्षणांकडे लक्ष : उष्णतेमुळं चक्कर, मळमळ, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास लगेच थंड जागी बसा, पाणी प्या आणि वैद्यकीय मदत घ्या.
- लहान मुले आणि वृद्धांची काळजी : त्यांना जास्त पाणी प्यायला लावा आणि त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा, कारण त्यांना उष्माघाताचा धोका जास्त असतो.
- प्राण्यांचं संरक्षण : पाळीव प्राण्यांना पाणी आणि सावलीत ठेवा, त्यांना बंद गाडीत सोडू नका.
- उष्णतेची लाट गंभीर असू शकते, त्यामुळं सतर्क राहून स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा.
हे वाचलंत का :