हैदराबाद : चीनची आघाडीची वाहन निर्माता कंपनी BYD नं आपली Sealion 7 ही इलेक्ट्रिक SUV अनेक देशांमध्ये विक्रीसाठी सादर केली आहे. नुकतंच या इलेक्ट्रिक SUV चं क्रॅश टेस्ट करण्यात आलं असून, ते Euro NCAP या युरोपियन संस्थेकडून पार पडलं आहे. या टेस्टमध्ये BYD Sealion 7 ला सुरक्षिततेसाठी पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. भारतात ही SUV जानेवारी 2025 मध्ये सादर करण्यात आली होती आणि फेब्रुवारी 2025 मध्ये अधिकृतपणे लॉंच झालीय. चला जाणून घेऊया या क्रॅश टेस्टचे तपशील आणि या वाहनाची वैशिष्ट्ये.

BYD Sealion 7 क्रॅश टेस्ट
चीनमधील प्रमुख वाहन निर्माता कंपनी BYD नं आपली Sealion 7 ही इलेक्ट्रिक SUV भारतीय बाजारात काही काळापूर्वी लॉंच केली आहे. या SUV चं नुकतीच क्रॅश टेस्ट घेण्यात आली असून, ही टेस्ट Euro NCAP या युरोपियन संस्थेनं केली आहे. या टेस्टमध्ये या वाहनाला सुरक्षिततेसाठी उत्तम कामगिरीसह 5 स्टार रेटिंग मिळालं आहे.

काय मिळाली रेटिंग?
Euro NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये BYD Sealion 7 ला सुरक्षेच्या बाबतीत पूर्ण 5 अंक मिळाले आहेत. Euro NCAP च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, हे टेस्ट एप्रिल 2025 मध्ये करण्यात आले. ही रेटिंग या SUV च्या 4X2 आणि 4X4 आवृत्त्यांसह लेफ्ट हँड आणि राइट हँड ड्राइव्हसाठीही लागू असेल.

किती स्कोअर मिळाला?
वेबसाइटवरील माहितीनुसार, या SUV ला प्रौढांच्या सुरक्षेसाठी 40 पैकी 34.8 अंक मिळाले आहेत. मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 46 अंक मिळाले आहेत. रस्त्यावरील इतर वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी या SUV ला 76 टक्के अंक मिळाले, तर सेफ्टी असिस्ट सिस्टमसाठी 79 टक्के अंक मिळाले आहेत.

भारतात कधी झाली लॉंच?
BYD नं ही SUV युरोपसह जगातील अनेक बाजारांमध्ये उपलब्ध केली आहे. भारतात ही गाडी जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती आणि फेब्रुवारी 2025 मध्ये अधिकृतपणे लॉंच झाली.

किती शक्तिशाली बॅटरी आणि मोटर?
कंपनीनं या SUV मध्ये 82.56 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही गाडी फक्त प्रीमियम आणि परफॉर्मन्स या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात असलेली मोटर 390 किलोवॅट पॉवर आणि 690 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान करते. ही गाडी 4.5 सेकंदात 0-100 किमी/तास वेग पकडू शकते. एका चार्जवर ती 567 किलोमीटरची NEDC रेंज देते. गाडीसोबत 7KW क्षमतेचा चार्जर आहे. ही गाडी ऑल व्हील ड्राइव्ह आणि रिअर व्हील ड्राइव्ह या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
किंमत किती?
भारतीय बाजारात ही SUV फेब्रुवारी 2025 मध्ये लॉंच झाली होती. लॉन्चिंगवेळी याची एक्स-शोरूम किंमत 48.9 लाख रुपये ठेवण्यात आली होती. तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 54.90 लाख रुपये आहे.
हे वाचलंत का :