ETV Bharat / technology

लांबच्या प्रवासासाठी सर्वोत्तम आरामदायी दुचाकी : तुमचं रायडिंग होणार आणखी आनंददायी - BEST COMFORTABLE BIKES 2025

2025 'या' चार आरामदायी दुचाकी Honda CB350, Royal Enfield Himalayan 450, KTM 390 Adventure, Bajaj Dominar 400 तुमचा रायडिंगचा आनंद आणखी वाढवतील.

best comfortable bikes
सर्वोत्तम आरामदायी दुचाकी (Honda,Royal Enfield,KTM, Bajaj)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : May 15, 2025 at 5:35 PM IST

Updated : May 16, 2025 at 10:39 AM IST

1 Min Read

हैदराबाद : दुचाकीवर लांब पल्ल्याच्या प्रवासात प्रत्येकालाच आरामाची गरज असते. प्रवास करताना कोणालाही पाठदुखी किंवा एक-दोन तासांत थकवा जाणवावा असं वाटत नाही. 2025 मध्ये भारतात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी खास दुचाकी कंपन्यानी सादर केल्या आहेत. या दुचाकीत आरामदायी सीट्स, चांगल्या सुविधा, दमदार इंजनचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळं तुम्ही विना थकवा लांब पल्याचा प्रवास सहज करू शकता. जर तुम्हाला रोड ट्रिप्स आवडत असतील, तर तुम्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही खाली दिलेल्या चार दुचाकीचा विचार करू शकता.

Honda CB350
होंडा CB350 ही रेट्रो-प्रेरित मोटरसायकल आहे. यात मऊ सीट आणि सोयीस्कर हँडल असून आकर्षक इंजिन दिलं आहे. त्यामुळं उच्च गती असतानाही तुम्हाला कंपनं कमी जाणवतात. ज्यामुळं लांब प्रवासासाठी ती रायडरसाठी खास बनते. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधा तुमचा प्रवास आणखी सुलभ करतात.

Honda CB350
Honda CB350 (Honda)

Royal Enfield Himalayan 450
हिमालयन 450 दुचाकी मुळात साहसी प्रवासासाठी बनवली आहे. यात शक्तिशाली इंजिन आणि आरामदायी प्रवासी सीट आहे, ज्यामुळं लांब प्रवासातही तुम्हाला थकवा जाणवत नाहीय. या दुचाकीचं सस्पेंशन खडबडीत रस्त्यांवर देखील तुम्हाला आराम देतं. डोंगर किंवा महामार्गावर, ही बाइक स्थिरता देण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Royal Enfield Himalayan 450
Royal Enfield Himalayan 450 (Royal Enfield)

KTM 390 Adventure
ऑफ-रोड रायडिंगचा तुम्हाला अनुभव घ्याचा असेल, तर KTM 390 अ‍ॅडव्हेंचर दुचाकी सर्वात उत्तम आहे. यात लांब सस्पेंशन, उंच हँडलबार आणि मोठी विंडशील्ड आहे, ज्यामुळं खराब रस्त्यांवरही आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येतो. या दुचाकीचं सीट दीर्घकाळ रायडिंगसाठी अतिशय उत्तम आहे. तिचं इंजिन डोंगर, दऱ्यातील चढ-उतारासाठी पुरेशी ताकद देतं. लांब पल्ल्याच्या दुचाकी प्रवासात आराम सर्वात महत्त्वाचा आहे. वरील बाइक्स तुम्हाला खडबडीत, गावांमधील रसत्यावर आरामदायी प्रवासाचा आनंद देतं.

KTM 390 Adventure
KTM 390 Adventure (KTM)

Bajaj Dominar 400
डोमिनार 400 दुचाकी आराम आणि कामगिरी यांचा संगम आहे. यात शक्तिशाली इंजिन आहे, जे महामार्गावर चांगला अनुभव देतं. यात मोठं सीट, उत्तम सस्पेंशन आणि मजबूत बांधणी यामुळं दुचाकी टिकाऊ बनते. डिजिटल डिस्प्ले, LED लाइट्स आणि ड्युअल-चॅनल ABS यामुळं प्रवास सुरक्षित आणि विना थकवा म्हणजे आरामदायी होतो.

Bajaj Dominar 400
Bajaj Dominar 400 (Bajaj)

हे वाचलंत का :

  1. ह्युंदाई स्टारेक्स भारतात लवकरच होणार दाखल,प्रीमियम डिझाइनसह आकर्षक वैशिष्ट्ये
  2. होंडा शाईन 100 : कमी बजेटमध्ये मायलेजसाठी सर्वोत्तम पर्याय
  3. ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 XC भारतात 2.94 लाख रुपयांना लॉंच : काय आहे नविन?

Last Updated : May 16, 2025 at 10:39 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.