हैदराबाद : ASUS India नं आपल्या Vivobook सिरीज अंतर्गत भारतात दोन नवीन लॅपटॉप्स, Vivobook S14 आणि Vivobook S14 Flip, लॉंच केले आहेत. हे लॅपटॉप्स विशेषतः प्रोफेशनल्स, विद्यार्थी आणि क्रिएटर्ससाठी डिझाइन केले गेले आहेत. दोन्ही डिव्हाइसेस 13व्या जनरेशनच्या Intel H-सीरीज प्रोसेसरसह येतात. हे मिलिट्री-ग्रेड टिकाऊपणा आणि पोर्टेबल डिझाइनसह सुसज्ज आहेत. याशिवाय, FHD IR कॅमेरा, इनबिल्ट प्रायव्हसी शटर आणि Copilot-रेडी कीबोर्डसारखे सिक्युरिटी आणि AI-इंटिग्रेटेड फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
Flip it your way🤩
— ASUS India (@ASUSIndia) April 22, 2025
The ASUS Vivobook S14 Flip (TP3402VAO) offers 360° flexibility and Intel Core i5 performance, with enhanced privacy features.
Click on the link below:https://t.co/gKtZyGvqrB
Get yours now!#ASUSIndia #VivobookSSeries #VivobookS14Flip pic.twitter.com/9X5y3uMWQx
Vivobook S14 आणि S14 Flip ची किंमत :
- Vivobook S14 (i7 मॉडेल): कॉन्फिगरेशननुसार किंमत 67,990 रुपये ते 79,990 रुपये.
- Vivobook S14 Flip (i5 मॉडेल) : सर्व कॉन्फिगरेशन्ससाठी किंमत 69,990 रुपये.
दोन्ही मॉडेल्स Windows 11 Home, Microsoft Office Home 2024 (लाइफटाइम) आणि Microsoft 365 Basic (1 वर्ष) सह प्रीलोडेड येतात. हे लॅपटॉप्स ASUS ई-शॉप, फ्लिपकार्ट, ASUS एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.
ASUS Vivobook S14 ची वैशिष्ट्ये:
- प्रोसेसर आणि रॅम : Intel 13th Gen Core i7 H-सीरीज प्रोसेसर, 16GB DDR5 RAM आणि 512GB SSD स्टोरेज.
- बॅटरी लाइफ: 70Wh बॅटरी, एकदा चार्ज केल्यावर 18 तासांपर्यंत चालते.
- वजन आणि जाडी: 1.4 किलो वजन आणि 1.59 सेमी जाडी, ज्यामुळं तो पोर्टेबल आहे.
- टिकाऊपणा : MIL-STD 810H अमेरिकन मिलिट्री-ग्रेड स्टँडर्ड.
- डिस्प्ले : 14-इंच FHD+ 16:10 स्क्रीन, 300 निट्स ब्राइटनेस, 86% स्क्रीन-टू-बॉडी रेशो.
- ऑडियो : Dolby Atmos स्टीरिओ स्पीकर्ससह इमर्सिव्ह साउंड.
- AI ॲक्सेस : डेडिकेटेड Copilot Key द्वारे AI फीचर्सचा सहज वापर.
ASUS Vivobook S14 Flip ची वैशिष्ट्ये:
- टच आणि स्टायलस सपोर्ट : 14-इंच FHD+ टचस्क्रीन, स्टायलस सपोर्टसह, क्रिएटिव्ह वापरकर्त्यांसाठी उपयुक्त.
- प्रोसेसर: Intel Core i5-13420H प्रोसेसर, 16GB DDR4 RAM आणि 512GB SSD स्टोरेज.
- बॅटरी आणि चार्जिंग: 50Wh बॅटरी, 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट.
- डिझाइन आणि टिकाऊपणा: मेटॅलिक लिड, MIL-STD 810H स्टँडर्ड, 1.5 किलो वजन.
- ऑडियो: Harman Kardon-ट्यून स्टीरिओ स्पीकर्स आणि Dolby Atmos तंत्रज्ञान.
- कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी: 1080p FHD वेबकॅम, Wi-Fi 6E, USB Type-C आणि HDMI 2.1 पोर्ट्स.
हे वाचलंत का :