हैदराबाद : ॲमेझॉननं प्रोजेक्ट कुइपरचं प्रक्षेपण खराब हवामानामुळं रद्द केलं आहे. कंपनीनं स्टारलिंक उपग्रह सेवेच्या स्पर्धेसाठी पहिल्या पूर्ण बॅचचे उपग्रह युनायटेड लॉंच अलायन्स (ULA) च्या Atlas V रॉकेटद्वारे फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून प्रक्षेपित करण्याची योजना आखली होती. अॅमेझॉननं अद्याप नवीन प्रक्षेपणची घोषणा केलेली नाही.
The launch of a United Launch Alliance Atlas V rocket carrying the Kuiper 1 mission for the Amazon’s Project Kuiper was scrubbed today due to inclement weather. A new launch date will be announced when approved on the range.https://t.co/Q1UeJK8FKl
— ULA (@ulalaunch) April 10, 2025
"लॉंच वेदर ऑफिसर ब्रायन बेलसन यांच्या मते, आज संध्याकाळी केप कॅनाव्हेरल येथे उर्वरित प्रक्षेपणासाठी हवामानाचा अंदाज आणि निरीक्षण NO GO आहे," असं ULA नं त्यांच्या थेट अपडेट्समध्ये म्हटलं आहे. "ढग आणि वारे यामुळं प्रक्षेपण करणं शक्य नाही."
प्रोजेक्ट कुइपर प्रक्षेपण
ॲमेझॉननं 27 उपग्रहांचं प्रक्षेपण 450 किलोमीटर उंचीवरील लो-अर्थ ऑर्बिटमध्ये करण्याचं नियोजन केलं होतं. हे प्रक्षेपण युनायटेड लॉंच अलायन्स (ULA) च्या Atlas V रॉकेटद्वारे फ्लोरिडाच्या केप कॅनाव्हेरल स्पेस फोर्स स्टेशनवरून होणार होतं. प्रोजेक्ट कुइपरच्या पहिल्या पूर्ण बॅचच्या उपग्रहांसाठी मूळ प्रक्षेपण खिडकी 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी 4:30 ते 6:30 (IST) दरम्यान ठरली होती. परंतु, खराब हवामानामुळं कंपनीनं हे रॉकेट प्रक्षेपण रद्द केलंय.
2023 मध्ये दोन प्रोटोटाइप उपग्रह प्रेक्षपित
ॲमेझॉनच्या प्रोजेक्ट कुइपरनं 2023 च्या उत्तरार्धात दोन प्रोटोटाइप उपग्रह - कुइपरसॅट-1 आणि कुइपरसॅट-2 - Atlas V रॉकेटद्वारे प्रक्षेपित केले होते, ज्यांनी लो-अर्थ ऑर्बिटमध्ये नियंत्रित हालचाली केल्या होत्या. कंपनीनं प्रारंभिक तारांगण उभारण्यासाठी एरियनस्पेस, ब्लू ओरिजिन, स्पेसएक्स आणि ULA सोबत 80 हून अधिक प्रक्षेपणांची व्यवस्था केली आहे. या प्रत्येक प्रक्षेपणातून डझनभर उपग्रह नेटवर्कमध्ये सामील होतील. हा करार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक प्रक्षेपण क्षमतेचा करार मानला जातो. प्रोजेक्ट कुइपरचं उद्दिष्ट 2026 च्या मध्यापर्यंत 3,236 उपग्रहांचं नेटवर्क लो-अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित करणं आहे, ज्यामुळं स्टारलिंकशी स्पर्धा करून हाय-स्पीड, कमी विलंब असलेली उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करता येईल.
उपग्रह इंटरनेटची गरज
जगात अजूनही असे प्रदेश आहेत, जिथं लोकांना चांगलं इंटरनेट कनेक्शन मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो, कारण फायबर ऑप्टिक केबल्स आणि सेल्युलर टॉवर्स प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. कठीण भूभाग तसंच गुंतवणुकीवर कमी परतावा मिळण्याची शक्यता असल्यामुळं यात अडचणी येतात. परंतु, उपग्रह आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटीला अशा समस्या येत नाहीत. ती पृथ्वीवरील सर्वात दुर्गम ठिकाणांनाही इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रदान करू शकते. स्टारलिंकसारख्या स्पर्धकांनी या उद्योगात आधीच वर्चस्व गाजवलं असताना, ॲमेझॉन प्रोजेक्ट कुइपरच्या प्रक्षेपणासह उपग्रह इंटरनेट क्षेत्रात प्रवेश करण्यास सज्ज झालं आहे. कंपनीचं उद्दिष्ट या प्रकल्पांतर्गत 3,000 हून अधिक उपग्रहांचं नेटवर्क स्थापित करून रहिवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना सेवा देणे आहे.
हे वाचलंत का :