हैदराबाद : जपानी दुचाकी निर्माता कंपनी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियानं (HMSI) भारतीय बाजारात आपली नवीन 2025 होंडा डिओ 125 स्कूटर लॉंच केली आहे. ही स्कूटर 16 एप्रिल 2025 रोजी अधिकृतपणे सादर करण्यात आली. या अपडेटेड स्कूटरमध्ये अनेक नवीन फीचर्स, OBD2B कम्प्लायंट इंजिन आणि आकर्षक ग्राफिक्स देण्यात आले आहेत. याशिवाय, या स्कूटरची किंमत आणि स्पर्धा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
काय बदल झाले?
होंडानं दिलेल्या माहितीनुसार, 2025 होंडा डिओ 125 मध्ये OBD2B कम्प्लायंट इंजिन देण्यात आलं आहे. याशिवाय, स्कूटरला नवीन ग्राफिक्स आणि काही अपडेटेड फीचर्ससह सादर करण्यात आले आहे.
इंजिनची ताकद
या स्कूटरमध्ये 123.92 सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर PGM-FI तंत्रज्ञानाचं इंजिन आहे. हे इंजिन OBD2B कम्प्लायंट असून, 6.11 किलोवॅट पॉवर आणि 10.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. यात स्टार्ट/स्टॉप तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळं मायलेज सुधारेल.
फीचर्स कशी आहेत?
2025 होंडा डिओ 125 मध्ये 4.2 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये ट्रिप मीटर, डिस्टन्स टू एम्प्टी यांसारखी माहिती मिळते. याशिवाय, होंडा रोड सिंक ॲप, स्मार्ट की आणि टाइप-सी चार्जिंग पोर्ट यांसारखे आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत.
किंमत किती?
2025 होंडा डिओ 125 दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. बेस व्हेरिएंट DLX ची पुण्यातील एक्स-शोरूम किंमत 96,749 रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट H-Smart ची एक्स-शोरूम किंमत 1.02 लाख रुपये आहे.
स्पर्धा कोणाशी?
होंडा डिओ 125 ची थेट स्पर्धा 125 सीसी सेगमेंटमधील होंडा ॲक्टिवा 125, सुझुकी ॲक्सेस 125, यामाहा फॅसिनो 125 आणि टीव्हीएस ज्युपिटर 125 यांच्याशी आहे.
हे वाचलंत का :