हैदराबाद : हीरो मोटोकॉर्पनं भारतीय बाजारात 2025 Hero Glamour आणि 2025 Hero Super Splendor Xtec या दोन मोटरसायकली OBD-2B इंजिनसह लॉंच केल्या आहेत. भारत सरकारनं सर्व दुचाकींसाठी OBD-2B इंजिन अनिवार्य केल्यानंतर, हीरोनं या मॉडेल्समध्ये नवीन अपडेट्स आणि फीचर्ससह सादरीकरण केलं आहे. या अपडेट्ससह दोन्ही मोटरसायकलींच्या किंमतीतही वाढ झाली आहे. चला, या दोन्ही बाइक्सच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.
2025 Hero Glamour
किंमत
2025 Hero Glamour दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. फ्रंट डिस्क आणि फ्रंट ड्रम ब्रेक. ड्रम ब्रेक व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 86,698 रुपये, तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 90,698 रुपये आहे. OBD-2B इंजिन अपडेटमुळं किंमतीत 2,000 रुपयांची वाढ झाली आहे.
रंग पर्याय
दोन्ही व्हेरिएंट्स तीन रंगांमध्ये उपलब्ध आहेत: कँडी ब्लेझिंग रेड, ब्लॅक मेटॅलिक सिल्व्हर आणि टेक्नो ब्लू मेट ब्लॅक. ड्रम ब्रेक व्हेरिएंटसाठी विशेष ब्लॅक-स्पोर्ट्स रेड रंग देखील आहे.
इंजिन
2025 Glamour मध्ये 124.7cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 10.53PS पॉवर आणि 10.4Nm टॉर्क जनरेट करतं. याला 5-स्पीड गिअरबॉक्स जोडलं आहे.
वैशिष्ट्ये
- ऑल-एलईडी हेडलाइट
- हॅझार्ड फंक्शन
- रिअल-टाइम मायलेज इंडिकेटरसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
- यूएसबी चार्जिंग पोर्ट
2025 Hero Super Splendor Xtec
किंमत
2025 Hero Super Splendor Xtec ची एक्स-शोरूम किंमत 88,128 रुपये आहे.
इंजिन
यात OBD-2B अनुरूप 124.7cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 10.7PS पॉवर आणि 10.6Nm टॉर्क जनरेट करतं.
रंग पर्याय
ड्रम आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध, यात मॅट नेक्सस ब्लू, मॅट ग्रे, ब्लॅक आणि कँडी ब्लेझिंग रेड रंग पर्याय आहेत.
वैशिष्ट्ये
- ऑल-एलईडी हेडलाइट
- डिजिटल कन्सोल
- SMS आणि कॉल अलर्टसाठी स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
- यूएसबी चार्जर
हे वाचलंत का :