ETV Bharat / state

शिक्षण अन् आता नोकरीही सायकलनंच ; प्राध्यापक करतात रोज 25 किलोमीटरचा सायकल प्रवास - WORLD BICYCLE DAY 2025

वाढत्या वातावरणात स्वतःला निरोगी ठेवणं हे एक आव्हान आहे. अशा वातावरणात 'सायकल' ही वरदानापेक्षा कमी नाही. कोल्हापुरातील एक प्राध्यापक दररोज 25 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करतात.

World Bicycle Day 2025
प्राध्यापक युवराज मोटे सायकल प्रवास (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 3, 2025 at 7:39 PM IST

Updated : June 3, 2025 at 8:36 PM IST

2 Min Read

कोल्हापूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कष्ट आणि वेळ वाचावा यासाठी अनेकजण लांबचा प्रवास सोपा व्हावा यासाठी अत्याधुनिक वाहनाचा सर्रास वापर करतात. यातून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. एकीकडं ही परिस्थिती असताना दुसरीकडं मात्र पर्यावरणाचं संवर्धन व्हावं या उद्देशानं कोल्हापुरातील एक प्राध्यापक दररोज 25 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करतात. डॉक्टरेटपर्यंत शिक्षण या सायकलीवरूनच त्यांनी पूर्ण केलं आणि आता महाविद्यालयात जाताना सुद्धा हे गुरुजी सायकलनेच प्रवास करतात. त्यांच्या या छोट्याशा कृतीतून त्यांनी समाजाला मोठा संदेश देण्याचं काम केलंय.‌ पाहुयात जागतिक सायकल दिनानिमित्त प्रा. युवराज मोटे यांच्या सायकल प्रेमाची गोष्ट.

सायकलवरून प्रवास करत घेतलं पीएचडीपर्यंत शिक्षण : उच्च शिक्षणाचं स्वप्न घेऊन सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त आटपाडी तालुक्यातला तरुण कोल्हापुरात येतो. उच्च शिक्षणासाठी अंग मोडेपर्यंत काबाडकष्ट करतो. मात्र, पर्यावरण संवर्धनासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही उर्मी त्याला गप्प बसू देत नाही. शिवाजी विद्यापीठात पीएचडीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तासिका तत्वावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाचं बाळकडू देताना पर्यावरण संवर्धनासाठी रोज सायकल प्रवास करण्याचा संकल्प या तरुण प्राध्यापकांने केला. तर गेली 14 वर्ष दीड लाख किलोमीटरचा सायकल प्रवास करत, पर्यावरणाचा समतोल साधला पाहिजे म्हणून हा अवलिया धडपडत आहे.

प्राध्यापक युवराज मोटे करतात दररोज 20 किलोमीटरचा सायकल प्रवास.... (Etv Bharat Reporter)

1 लाख 25 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास : सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावचे युवराज शंकर मोटे यांनी भूगोल विषयात पदव्युत्तर पदवी संपादन करून कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात भूगोल विषयातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच पर्यावरणाची आवड असल्यानं हालाखीची परिस्थिती असूनही वडील किराणा दुकान चालवत युवराज यांच्या शिक्षणासाठी मदत करत होते. लहानपणापासूनच सायकलचा प्रवास युवराज मोटे यांना आपलासा वाटायचा. यातूनच कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेतानाही त्यांनी सायकलची साथ कधी सोडली नाही. गेली 14 वर्ष उच्च शिक्षण घेऊनही आणि प्राध्यापकाची नोकरी लागून सुद्धा प्रा. डॉ. युवराज मोटे दररोज महाविद्यालयापर्यंतचा 20 किलोमीटर प्रवासासह, कोल्हापूर शहरातर्गत किमान सहा ते सात किलोमीटरची दररोज 25 किलोमीटर प्रवास ते सायकलने करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे 1 लाख 25 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. सध्या कोल्हापुरातील केएमसी महाविद्यालयात ते तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम करतात. दररोज सायकलवरून येणारे जाणारे गुरुजी बघून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा, डॉ. युवराज मोटे यांनी व्यक्त केली.

12 वर्षे ज्ञानदान, अजूनही तासिका तत्त्वावर : शिवाजी विद्यापीठात धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील उपोषणाची समस्या हा संवेदनशील विषय घेऊन मोटे यांनी पीएचडी पूर्ण केली. याला आता 12 वर्षे उलटली आहेत. या विषयात 15 हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. भूगोल आणि पर्यावरण विषयावर 100 पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. कोल्हापूरजवळच्या अनेक महाविद्यालयात प्रमुख व्याख्याते म्हणून जाताना प्रा. डॉ. युवराज मोटे सायकलवरूनच कार्यक्रम ठिकाणी पोहोचतात. त्यांना पाहून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पाहुणे सुद्धा आवक होत असल्याचं प्राध्यापक मोटे यांनी सांगितलं. त्यांनी केलेल्या संशोधनाचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मासिकांतून लेख प्रकाशित झाले आहेत. तर विद्यापीठस्तरीय सहावेळा, तर राज्यस्तरीय एकदा आणि आविष्कार संशोधन पुरस्काराचे मानकरी प्राध्यापक मोटे ठरले आहेत.

'सायकलच पहिलं प्रेम' : ग्रामीण भागातून आलेल्या प्राध्यापक मोटे यांचं आतापर्यंत आयुष्य संघर्षपूर्ण राहिलं आहे. या पडत्या काळात त्यांना सायकलनं मोठा आधार दिला. त्यामुळं सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणासोबत असलेली जिवाभावाची सायकलचं माझं पहिलं प्रेम असल्याची प्रतिक्रिया, प्रा. युवराज मोटे यांनी दिली. शेवटच्या श्वासापर्यंत पर्यावरणाचा संदेश देत आपण सायकलवरूनच प्रवास करण्याचा दृढनिश्चय ही या प्राध्यापक युवराज मोटे यांनी केला. त्यांचं हे सायकल प्रेम पाहून सामान्य कोल्हापूरकर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा -

  1. पुणेकर ज्येष्ठ नागरिकांची मेळघाटात सायकल भ्रमंती : आठ दिवसात 500 किमी जंगल भ्रमंती
  2. इलेक्ट्रिक वाहन महाग असल्यानं बाप-लेकानं लढवली युक्ती; केवळ पाच दिवसात घरीच तयार केली 'इलेक्ट्रिक सायकल' - Father Son Built Electric Bicycle
  3. पर्यावरण रक्षणासाठी निघालेल्या तिघांचं कोल्हापूरात स्वागत, 11 राज्यांतून केला 11 हजार किमी सायकल प्रवास - Travel for environmental protection

Last Updated : June 3, 2025 at 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.