ETV Bharat / state

आतमध्ये कोण कोणाच्या पाया पडले..., शाहांच्या दौऱ्यावरून पाटलांचा अजितदादांना उपरोधिक टोला - AMIT SHAH TOUR RAIGARH

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आतमध्ये कोण कोणाच्या पाया पडले माहीत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Jayant Patil sarcastic attack on Ajit Pawar
जयंत पाटलांचा अजित पवारांना उपरोधिक टोला (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 13, 2025 at 7:26 PM IST

1 Min Read

अहिल्यानगर - देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना अर्थ मंत्रालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आता विरोधकांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आतमध्ये कोण कोणाच्या पाया पडले माहीत नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार 345 व्या पुण्यतिथीनिमित्त देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगड येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. तर गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याच दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे अर्थ खात्याकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या फायलींना प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. दरम्यान असे काहीही बोलणे झाले नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे संबंध चांगले असून, त्यांना काही सांगायचं असेल तर ते थेट माझ्याशी बोलतील, असेदेखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. मात्र आता विरोधकांनीही या विषयावर आपापली मते मांडलीत.

आत जाऊन कोण कोणाच्या पाया पडले माहीत नाही : दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील या विषयावर आपली प्रतिक्रिया दिली असून, ते अहिल्यानगर येथील श्रीगोंदा तालुक्यात माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माहीत नाही कोणी काय तक्रार केली या अशा बातम्या बाहेरच्याच असतात, आत जाऊन कोण कोणाच्या पाया पडले, याविषयी मी जास्त काही बोलत नाही. आत जाऊन काय त्यांचे प्रश्न असतील ते त्यांचा वैयक्तिक विषय आहे. महाराष्ट्रातील सरकार कशा रीतीने चाललंय हे देशातील आणि राज्यातील जनता पाहत आहे, असा उपरोधिक टोला माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावलाय.

हेही वाचा:

मोठी बातमी! वर्ष 2026 अखेर शेतकऱ्यांना 12 तास मोफत वीज मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन

महायुतीत एकनाथ शिंदे नाराज? शिंदे अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, ते अजित पवारांशी बोलतील - सुधीर मुनगंटीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.