मुंबई- सध्या दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. महागाईचा आगडोंब उसळला असून, बेरोजगारी वाढली आहे. सोने, तेल, पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडेलत. त्यामुळे सामान्य माणसाने जगायचे कसे, असा प्रश्न जनतेला पडलाय. दरम्यान, राष्ट्रवादी (शरद पवार) युवक काँग्रेसने महागाईच्या विरोधात आंदोलन केलंय. राष्ट्रवादी (शरद पवार) युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केलीय. यानंतर पोलिसांनी मेहबूब शेखसह आंदोलकांना ताब्यात घेतलंय.
हेच का अच्छे दिन? : दरम्यान, मुंबईतील ईडी कार्यालयाच्या समोर राष्ट्रवादी (शरद पवार) युवक काँग्रेसने आंदोलन केलंय. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तर बीजेपी सरकार हाय हाय..., कच्चे तेल स्वस्त पण दरवाढ मस्त... हेच का अच्छे दिन? तेल कंपन्यांचा नफा फुगतो, जनता मात्र झुकते..., वा रे मोदी तेरा खेल, सोने का भावमें बिकता तेल..., केंद्र सरकारची लाज हरवली..., जनतेचे खिसे फाटले, अशा घोषणाबाजी आंदोलकांनी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम... : दुसरीकडे हे सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करतंय. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम सरकार करीत आहे. महागाई वाढली आहे, महागाईचा आगडोंब उसळला आहे, तरुणांना रोजगार नाही, बेरोजगारी वाढलीय. जर महागाई कमी केली नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, अशा इशारा यावेळी राष्ट्रवादी (शरद पवार) युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सरकारला दिलाय. तसेत राज्यभर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, लाडकी बहिणींची मतं घेऊन आता पैसे देण्याची वेळ आल्यावर लाडक्या बहिणीला दोडकं करायचं काम सरकार करीत आहे. सरकार बळाचा वापर करून आम्हाला आंदोलन करू देत नाही. पेट्रोल-डिझेलवर जो कर लावलाय, तो कर बंद करावा, अशी आमची मागणी असल्याचे मेहबूब शेख म्हणालेत.
हेही वाचाः
धक्कादायक : ठाण्यात मागील वर्षभरात दोन हजार बालकांवर अत्याचार, बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर