पुणे- महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले हा चित्रपट आज प्रदर्शित करण्यात येणार होता, मात्र काही संघटनांनी या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय. सेन्सॉर बोर्डाने फुले चित्रपटातील काही दृश्यांना विरोध दर्शविलाय. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आक्रमक झाले असून, ज्या दृष्यांवर आक्षेप घेतलाय ते महात्मा फुलेंच्या समग्र साहित्यामधील महाराष्ट्र शासनाने प्रदर्शित केलेल्या भागाचा तो एक हिस्सा आहे. याला केंद्र शासनाने मान्यतादेखील दिलेली असताना सेन्सॉर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही. बोर्ड जर विरोध असाच ठेवणार असेल तर बोर्डाचे जे मेंबर आहेत, त्यांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंबेडकर यांनी दिलाय.
चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलली : क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर अधारीत चित्रपट "फुले" हा जयंतीचे औचित्य साधून 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. पण काही समूहाने चित्रपटातील अनेक दृश्य वगळण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार करून चित्रपट प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलीय. तसेच अनेक दृश्य वगळलीत, या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली फुलेवाड्याबाहेर आंदोलन करण्यात आलंय. यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी बोर्डाला इशारा दिला.
आजही विरोध करणाऱ्या शक्ती अस्तित्वात : यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महात्मा फुले आणि सावितीबाई फुले यांचं जे कार्य आहे, त्या कार्याला आजही विरोध करणाऱ्या शक्ती अस्तित्वात आहेत. त्यांचं कार्य हे दीडशे वर्षांपेक्षा अधिक झालेलं असताना देखील त्यांनी सुरू केलेलं कार्य सर्व समाजात स्वीकारलं जातं नाहीये. आजही काही समूह असे आहेत की, ज्यांना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली क्रांती जळजळ करीत आहे ते विरोध करीत आहे, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.
उगीचच ढोल वाजवण्याचा काम भाजपाच्या लोकांनी करू नये : 26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाची कस्टडी मिळाली असून, त्याला भारतात आणण्यात येणार आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, हे पूर्ण यश नव्हे तर तुटपुंज आहे. उगीचच ढोल वाजवण्याचा काम भाजपाच्या लोकांनी करू नये, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
हेही वाचा :