पुणे - रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक (waghya dog statue news) हटवण्यावरून राज्यात वाद सुरू आहे. संभाजीराजे छत्रपतींनी वाघ्याचं स्मारक हटविण्याची मागणी केली आहे. या मागणीला शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी विरोध दर्शवला आहे. संभाजीराजे हे शंभर टक्के चुकीचं बोलत आहेत. वाघ्या कुत्र्याची समाधी तिथेच राहिली पाहिजे, असं स्पष्ट मत संभाजी भिडे यांनी केलं.
वाघ्या कुत्र्याचं स्मारक हटवण्याच्या मागणीबाबत बोलताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे म्हणाले, वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलं आहे. ती कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्यानं चितेत उडी घेतली, हे सत्य आहे. त्यामुळे स्मारक म्हणून ते केलं आहे. माणसं एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री एकनिष्ठ असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे, याचं द्योतक म्हणून वाघ्या कुत्र्याचं स्मारक तिथंच पाहिजे. तसेच स्वार्थासाठी कशीही मत बदलणाऱ्यांना माणसांना माझे मत पटणार नाही. पण, त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही, असं भिडे यांनी म्हटलं.
डान्सबारची सावत्र असणारी जुळी भावंड-कुणाल कामरावरून सुरू असलेल्या गोंधळाबाबत बोलताना संभाजी भिडे म्हणाले, कामरा म्हणून नादान प्रकार चाललाय. यावरून विधानसभेत जो धुडगुस चाललाय, तो लोकशाहीला शोभणारा नाही. आर. आर. पाटलांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. आर. आर. पाटलांची हिम्मत अलौकिक होती. कामरा नावाच्या पद्धतीचं हॉटेल चालवणं म्हणजे डान्सबारची सावत्र असणारी जुळी भावंड आहेत, अशी टीका स्टँडअप कॉमेडीवरून संभाजी भिडे यांनी केली.
शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते- छत्रपती शिवाजी महाराज हिंदुत्ववादी होते की सर्वधर्म समभाव होते ? या विषयावरून बोलताना भिडे म्हणाले, शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. शिवाजी महाराज हिंदु धर्माच्या रक्षणासाठी होते. त्यामुळे शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते. पण, शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवलं आहे. इतिहासाचा अभ्यास कमी आहे. पण, शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत. स्वतः शहाजीराजे यांनी हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचं राष्ट्र करायचं आहे, असं बोललेले आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय. त्यामुळे सगळा चोथा झाला आहे, असं मत यावेळी संभाजी भिडेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा-