ETV Bharat / state

विरार लोकल झाली 158 वर्षांची; विरार ते चर्चगेट दरम्यान धावली पहिली लोकल - VIRAR LOCAL

मुंबईशी वसई-विरारकरांना जोडणारी आणि लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेली विरार लोकल (Virar local) 158 वर्षांची झाली आहे.

Virar local train
विरार लोकलला 158 वर्षे पूर्ण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 13, 2025 at 1:44 PM IST

2 Min Read

मुंबई: पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पहिली लोकल 12 एप्रिल 1867 रोजी धावली होती. ही गाडी विरार स्थानकापर्यंत चालवण्यात आली होती. या घटनेला शनिवारी तब्बल 158 वर्षे पूर्ण झाली. त्यावेळी बॉम्बे बॅक बे या नावाच्या स्थानकावरुन ही गाडी सुटली होती आणि विरारला पोचली होती. बॉम्बे बॅक बे हे स्थानक चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकांच्या मध्ये होते. पश्चिम रेल्वेचे नाव देखील त्यावेळी बॉम्बे, बडोदा आणि सेंट्रल इंडिया (बीबी अ‍ॅन्ड सीआय) असे होते. नंतर त्याला पश्चिम रेल्वे असे नाव बदलण्यात आले.

कसा होता प्रवास? : त्याकाळी ही गाडी चार डब्यांची चालवण्यात येत होती. विशेष बाब म्हणजे त्या काळात या प्रवासाला आजच्या विरार ते चर्चगेट या प्रवासापेक्षा कमी वेळ लागत होता. विरार येथून ही गाडी सकाळी 6.45 ला अप दिशेने चालवण्यात येत असे. तर बॉम्बे बॅक बे येथून ही गाडी डाऊन दिशेने विरारसाठी सायंकाळी 5.30 वाजता चालवण्यात येत होती. त्यावेळी या गाडीला नालासोपारा, वसई, वसई दरम्यानचे एक स्थानक, बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, सांताक्रुझ, वांद्रे, माहिम, दादर व ग्रॅंट रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले होते.

मुंबई लोकलच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे
1) 12 एप्रिल 1867 ला विरार ते चर्चगेट दरम्यान पहिली लोकल धावली.
2) 1892 पर्यंत या सेवेतील फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. विरारसाठी 4, बोरीवलीसाठी 1 आणि वांद्रेसाठी 27 फेऱ्या चालवण्यात येऊ लागल्या.
3) 1870 मध्ये चर्चगेट स्थानकाची निर्मिती करण्यात आली.
4) 1873 मध्ये कुलाबा टर्मिनस सुरु करण्यात आले. 1900 पर्यंत पुन्हा फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली. विरारसाठी 5, बोरीवलीसाठी 7 अंधेरीसाठी 3 आणि वांद्रेसाठी 29 फेऱ्या चालवल्या जावू लागल्या.
5) 1930 मध्ये कुलाबा स्थानक बंद करण्यात आले. 1936 मध्ये वाफेची इंजिने सेवेतून हटवण्यात आली आणि त्यावेळी बोरीवली ते विरार स्थानका दरम्यानच्या मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले.
6) मार्च 1961 मध्ये 9 डब्यांच्या फेऱ्या सुरु करण्यात आल्या.
7) 1972 मध्ये पश्चिम रेल्वेच्या सेवेतील फेऱ्यांची संख्या 500 वर पोचली.
8) 1986 मध्ये 12 डब्यांची लोकल सुरु करण्यात आली. त्याच वर्षी महिलांसाठी लेडिज स्पेशल चालवण्यात प्रारंभ झाला व लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आसने आरक्षित ठेवण्यास प्रारंभ करण्यात आला.
9) 2003 मध्ये पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या 1000 वर पोचली.
10) नोव्हेंबर 2009 मध्ये पश्चिम रेल्वेच्या सेवेत 15 डब्यांची गाडी सुरु करण्यात आली.
11) डिसेंबर 2017 पासून आणखी एक पाऊल पुढे जात वातानुकुलित लोकल सुरु करण्यात आली.

हेही वाचा -

  1. मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा!
  2. मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
  3. मध्य रेल्वे चालवणार आणखी १४ एसी लोकल फेऱ्या, प्रवासी संघटनांचा आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.