ETV Bharat / state

पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील: केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत - GAJENDRA SINGH SHEKHAWAT VISIT PUNE

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पुण्यातील शनिवारवाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शनिवारवाड्याच्या भिंती रंगलेल्या पाहून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

Gajendra Singh Shekhawat Visit Pune
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 6, 2025 at 9:30 AM IST

2 Min Read

पुणे: "मध्यकालीन भारताच्या इतिहासात योगदान असलेल्या शनिवारवाड्याचं स्थान महत्वाचं आहे. ही वास्तू पुण्याची, पेशवाईची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात. इथं येणाऱ्या पर्यटकांना शनिवारवाड्याचा भव्यदिव्य अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील आहे," अशी माहिती केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली.

Gajendra Singh Shekhawat Visit Pune
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Reporter)

शनिवारवाडा पुण्याचं वैभव : पुण्याचं वैभव, ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या शनिवारवाड्याला केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेखावत यांच्या हस्ते बहुभाषिक स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड अ‍ॅपचं उद्घाटन, तसंच, शनिवारवाड्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी शनिवारवाड्याची पाहणी करताना शेखावत यांनी शनिवार वाड्यातील आतमधील भिंतीवरील कलर बाबत नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

Gajendra Singh Shekhawat Visit Pune
स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड अ‍ॅपचं उद्घाटन (Reporter)

शनिवारवाडा समृद्ध इतिहासाचा अनमोल ठेवा : यावेळी गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यानंतर पेशवाई आणि पुण्याचं योगदान व त्याचा नावलौकिक देशभरात आहे. त्यामुळे ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून, समृद्ध इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. पर्यटकांना येथील इतिहास सहजपणे समजून घेता यावा, पर्यटन अधिक सुकर व्हावं, यासाठी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यासह इतर इतिहास अभ्यासकांनी आणि शनिवारवाडा संवर्धन कार्यात योगदान देणाऱ्या लोकांनी माझ्याकडं काही प्रस्ताव दिले आहेत. शनिवारवाड्याचे विविध पैलू, त्याचं महत्व समजून घेतलं. त्यावर विचार करून, पुरातत्व विभागाशी समन्वय साधून इथं सोयीसुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करेन. आज उद्घाटन झालेल्या ऑडिओ गाईडमुळे पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास ध्वनिस्वरूपात समजून घेता येईल."

Gajendra Singh Shekhawat Visit Pune
पाहणी करताना केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत (Reporter)

मूळ साच्यामध्ये फेरबदल करता येत नाही : "ही संरक्षित वास्तू असल्यानं इथं सुधारणा करण्यावर बरीच बंधनं आहेत. मूळ साच्यामध्ये फेरबदल करता येत नाही. यासह अन्य काही अडचणी असल्यानं ऐतिहासिक संरक्षित वास्तूंमध्ये पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा तयार करण्यात अडचणी येतात. तरीही यातून मार्ग काढून या पर्यटनस्थळाचा अनुभव चांगल्या पद्धतीनं कसा घेता येईल, यावर उपाययोजना करणार आहोत. संरक्षित वास्तूच्या 100 मीटर परिसरात कोणतंही बांधकाम करता येत नाही, तर 200 मीटर परिसरात काही काम करायचं असल्यास कायद्यानं परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शक्य होईल, त्या सुविधा उपलब्ध करून देऊ," असंही यावेळी शेखावत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Gajendra Singh Shekhawat Case: केंद्रीय मंत्री शेखावत यांच्यावर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण
  2. G 20 Summit In Jodhpur : गिग प्लॅटफॉर्म कामगारांनाही पेन्शन सारख्या सुविधा मिळाल्या पाहिजेत - केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत
  3. मोदींच्या मंत्र्याने Indian Air Force Day 2022 च्या दिवशी टाकला पाकिस्तानी लढाऊ विमानांचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.