अहिल्यानगर : बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज शिर्डीमध्ये साई बाबांचं दर्शन घेतलं. "राजकारणात प्रत्यकाला वेळोवेळी संधी मिळत असेत. जर महायुती मधल्या काही ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली नसेल तर, त्यांनी जाहीर वक्तव्य करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आपली नाराजी व्यक्त करून प्रश्न सोडवला पाहिजे," असा सल्ला मंत्री सावे यांनी महायुती मधल्या नाराज नेत्यांना दिला.
छत्रपती संभाजीनगर मधल्या पाणी टंचाईला उद्धव ठाकरे सरकार जबाबदार : साई बाबांच्या दर्शनानंतर मंत्री अतुल सावे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती संभाजीनगर मधल्या पाणी टंचाईच्या प्रश्नाकडं मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं लक्ष वेधलं असता ते म्हणाले, "छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी प्रश्न पेटलाय. शहरात तब्बल बारा ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिक हैराण झाले आहेत. शहरात होणाऱ्या पाणी टंचाईला ठाकरे सरकार जबाबदार आहे. तेव्हा अडीच वर्षांचं उद्धव ठाकरेंचं सरासरी सरकार होतं. त्या काळात त्यांनी काहीच काम केलं नाही. त्यामुळं ही स्थिती निर्माण झाली आहे."
लवकरत होणार शहराला पाणी पुरवठा : "ठाकरे सरकारच्या काळात रखडेलेलं काम लवकरच पूर्ण होणार आहे. जून महिन्याच्या शेवट पर्यंत शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी मिळण्यास सुरुवात होईल," असं मंत्री अतुल सावे यांनी शिर्डीत बोलताना स्पष्ट केलं.
मंत्री सावेंचा सत्कार : मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या सामधीचं दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी शाल आणि साई मूर्ती देऊन मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचा सत्कार केला.
हेही वाचा :