ETV Bharat / state

साताऱ्यात ट्रक-आशयर टेम्पोची समोरासमोर धडक; अपघातात दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी - Satara Accident News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 10:39 AM IST

Satara Accident News : लोणंद-सातारा मार्गावर सोमवारी पहाटे आयशर टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर भीषण अपघात झालाय. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्यानं ट्रक चालकाचा केबीनमध्येच जळून मृत्यू झाला, तर टेम्पो चालकावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Satara Accident News
साताऱ्यात भीषण अपघात (ETV BHARAT Reporter)

सातारा Satara Accident News : आयशर टेम्पो आणि ट्रकची समोरासमोर धडक होवून दोन्ही चालकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. लोणंद सातारा मार्गावरील अंबवडे चौकानजीक सोमवारी पहाटे हा भीषण अपघात झालाय. अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्यानं ट्रक जळून खाक झाला. अल्ताफ मन्सुरी (मध्य प्रदेश), आणि महेश दयानंद घुगे (मूळ रा. उस्मानाबाद, हल्ली रा. कोल्हापूर), अशी मृत ट्रक आणि टेम्पो चालकांची नावे आहेत.

अपघातानंतर ट्रक जळून खाक : ट्रक आणि टेम्पोचा समोरासमोर झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. त्यामुळं चालकाचा केबीनमध्येच जळून मृत्यू झाला. अपघातात टेम्पो चालकही गंभीररित्या जखमी झाला होता. त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी त्याला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना सकाळी त्याचाही मृत्यू झाला.

दोन्ही वाहनांचा चक्काचूर : अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसंच ट्रकने पेट घेतल्यानं ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ट्रक चालकाला केबीनमधून बाहेर पडता न आल्यानं त्याचा केबीनमध्येच जळून मृत्यू झाला. पहाटे झालेल्या अपघतानंतर आसपासच्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर वाठार स्टेशन (कोरेगाव) पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्याऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक बबाला घटनास्थळी पाचारण केलं.

ट्रक, टेम्पोमधील दोघे जखमी : या अपघातात ट्रकमधील मांगीलाल रामप्रसाद भिल्ल (मध्य प्रदेश) आणि टेम्पोतील उदय आबाजी पाटील (रा. कणेरी मठ, कोल्हापूर), हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताग्रस्त वाहने अद्याप घटनास्थळी असून पोलीस घटनास्थळाचा पंचनामा आणि अन्य कायदेशीर कार्यवाही करत आहेत. अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. डी. माने, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा -

  1. सेल्फीच्या नादात तरुणी 100 फूट दरीत कोसळली, रेस्क्यू टीम ठरली देवदूत! - Satara Selfie Accident
  2. साताऱ्यात ब्रेकफेल डंपरचा थरार; एका कारसह सात दुचाकींना चिरडलं, पाहा व्हिडिओ
  3. Satara Accident News : आयशर टेम्पो आणि मालट्रकचा भीषण अपघात; ३ जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.