ETV Bharat / state

"मी जेवढं काम केलं, तेवढं करणारा आमदार मिळणार नाही', उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामतीत दावा - AJIT PAWAR

"१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय काम केलं, ते पाहा...आणि मी केलेलं काम पाहा...मी अजूनही काम करणार आहे", असं अजित पवार यांनी म्हटलंय.

Deputy Chief Minister Ajit Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 6, 2025 at 6:50 PM IST

Updated : April 6, 2025 at 7:01 PM IST

2 Min Read

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील विविध विकास कामांना भेटी दिल्या. यानंतर त्यांनी बारामती येथे दिव्यांगांना मोफत सायकल वाटप केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या शरद पवार यांच्यावर टीका केलीय. "१९५२ पासून आतापर्यंत जे आमदार झाले, त्यांनी काय काम केलं, ते पाहा...आणि मी केलेलं काम पाहा...मी अजूनही काम करणार आहे", असं अजित पवार यांनी म्हटलंय.

सहानभूती नको तर समान संधी दिली पाहिजे : पुढं अजित पवार म्हणाले की, "बजेटमध्ये डीपीडीसीला २२००० कोटी दिले. त्यातला एक टक्का दिव्यांगांसाठी खर्च करण्याची तरतूद केलीय. दिव्यांगाना सहानभूती नको तर समान संधी दिली गेली पाहिजे. दिव्यांगाना इतरांसोबत समान संधी मिळाली पाहिजे, योग्य संधी मिळाली पाहिजे, त्यांना जर सुविधा दिल्या तर दिव्यांग व्यक्ती देखिल समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये योगदान सुद्धा देऊ शकतात. तसंच, दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आपण घेतला", असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ETV Bharat Reporter)

पाच वर्ष एवढं काम करणार की... : " मी जेवढं काम केलंय, तेवढं काम करणारा कोणी आमदार तुम्हाला मिळणार नाही, हा आपला दावा आहे. "१९५२ पासून आजपर्यंत बारामतीचं प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदारांची कारकीर्द पाहा. त्यांनी-त्यांनी त्यांच्या कारकिर्दित काय काम केलंय आणि तुम्ही मला १९९१ पासून आमदार केल्यापासून मी माझ्या कारकिर्दीत काम करून दाखवलं आणि मी थांबणार नाही. तुम्ही मला लाखांनी निवडून दिलंय की, मी माझी पाच वर्ष एवढं काम करणार की आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काम, त्या-त्या कारकिर्दीमध्ये झालं नाही, तेवढं काम मी या टर्ममध्ये करून दाखवणार", असं अजित पवार यांनी सांगितलं.

आपली मुलं काय करतात? यावर पालकांनी लक्ष ठेवावं : "परवा माझ्याकडे एक क्लिप आली. सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं. त्याच्यामध्ये एकाला मारहाण केली. कुत्र्याला जसं मारत असतील तस मारलं. मी पोलिसांना सांगितलं कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. हे जर पुढे असं चालत राहीलं तर मी मोका लावीन", असा सज्जड दम अजित पवार यांनी दिला. तसंच, "आपली मुलं काय करत आहेत? यावर लक्ष ठेवणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे. ती जबाबदारी पालकांनी पार पाडावी. मला काही लोकांचा फोन येतो की, दादा पोरगं आहे, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलं. ज्यांनी फोन केला, त्यांना शरम कशी वाटत नाही असं सांगायला. सगळ्यांना नियम सारखा", असं सांगत अजित पवारांनी गुन्हेगारांना पाठीशी घालू पाहणाऱ्याला चांगलेच सुनावले.

हेही वाचा :

  1. मुंबईचे डबेवाले चालले सहा दिवसांच्या सुट्टीवर; जाणून घ्या, काय आहे कारण?
  2. लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःवर गोळी झाडून केला आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती चिंताजनक
  3. "...तर मी दिलगिरी व्यक्त करतो", कृषीमंत्र्यांनी आधी शेतकऱ्यांना सुनावलं, आता मागितली माफी!

Last Updated : April 6, 2025 at 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.