ETV Bharat / state

रोहित पवारांचं जितकं वय तितका माझा अनुभव; रोहित पवारांच्या ट्विटवर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर - ROHIT PAWAR TWEET

नांदेडमध्ये काल सभापती राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात अशोक चव्हाणांनी त्यांची प्रशंसा केली होती. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीय.

Ashok Chavan reply to Rohit Pawar tweet
रोहित पवारांच्या ट्विटवर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 1:32 PM IST

1 Min Read

अहिल्यानगर- कर्जत जामखेडमध्ये मी रोहित पवार यांच्या प्रचारासाठी गेलो होतो. पण लोक माझ्या कानात सांगायचे राम शिंदे कामाचा माणूस आहे, असं अशोक चव्हाण काल एका कार्यक्रमात बोलले होते. नांदेडमध्ये काल सभापती राम शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात अशोक चव्हाण यांनी त्यांची प्रशंसा केली होती. त्यावरून आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमातून अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीय.

खऱ्या खोट्याचं उत्तर कर्जत जामखेडच्या लोकांनी दोनदा दिलं : अशोक चव्हाण तुम्ही आदर्श आणि मोठे नेते आहात. तुम्हाला भाजपात का जावं लागलं आणि आपल्यासारख्या मोठ्या नेत्याचे काय स्थान आहे हे राज्याला माहीत आहे, असा चिमटा रोहित पवार यांनी काढलाय. खऱ्या खोट्याचं उत्तर कर्जत जामखेडच्या लोकांनी दोनदा दिल्याचंही ते म्हणालेत.

राम शिंदे यांचेही काम आहे, अस्तित्व आहे : राज्यसभेत जाण्यासाठी मला कुणालाही शरण जावं लागल नाही, असा टोलादेखील रोहित पवार यांनी लगावलाय. दरम्यान, रोहित पवार यांच्या ट्विटवर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलंय. लोकशाहीत विरोधकाची प्रशंसा करू नये, अशी अपेक्षा चुकीची आहे. रोहित पवार दोन वेळा आमदार आहेत, याची जाणीव मला आहे. पण राम शिंदे यांचेही काम आहे, अस्तित्व आहे. राम शिंदे नांदेडला आले तेव्हा त्यांच्याबद्दल मी गौरवोद्गार काढले, त्याचं वाईट वाटायचं कारण नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत. रोहित पवार यांचं जितकं वय आहे, तितका माझा अनुभव आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 20 हजार वह्यांच्या माध्यमातून भव्य प्रतिमा; पाहा व्हिडिओ - Dr Ambedkar Image Beed
  2. Replica Of Largest Buddha In Pune: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात साकारली बुद्धाची प्रतिकृती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.