मुंबई : माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. आजारपणामुळं ते अनेकदा विविध कार्यक्रमाला अनुपस्थित राहत आहेत. मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, त्यांना हा आजार झालाच नसल्याचं आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच स्पष्ट केलं आहे. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत त्यांना जडलेल्या आजाराची यात माहिती देण्यात आली.
धनंजय मुंडे यांची पोस्ट आहे तशी :
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 18, 2025
श्री…
आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला 'बेल्स पाल्सी' हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार. मात्र, मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होत असून, बोलायला त्रास आहे. मात्र, नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.
धनंजय मुंडे हे बेल्स पाल्सी आजारानं ग्रस्त : धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत झालेल्या आजाराची माहिती दिली आहे. मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंडे यांना अर्धांगवायू झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यानंतर मुंडे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. मुंडे हे मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. काही दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
हेही वाचा - करुणा शर्मांना पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम, धनंजय मुंडेंना धक्का