ETV Bharat / state

हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि नयनरम्य आतिषबाजीत श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव संपन्न - THE CHARIOT FESTIVAL

श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

अंबाबाईचा रथोत्सव
अंबाबाईचा रथोत्सव (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 12:02 AM IST

1 Min Read

कोल्हापूर : अंबामाता की जय..चा गजर, रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या, ढोल ताशाचा गजर, भालदार, चोपदार, विद्युत रोषणाई फुलांनी सजलेला रथ असा शाही लवाजमा आणि त्यात विराजमान श्री करवीर निवासिनी अंबाबाईची उत्सवमूर्ती आणि रथावर होणार फुलांचा वर्षाव. अशा मंगलमय वातावरणात जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळा पार पडत असतो. कसा असतो हा सोहळा पाहुयात या विशेष रिपोर्ट मधून..

साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात ज्योतिबा चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रथोत्सव सोहळा पार पडत असतो. वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासीयांची भेट घेण्यास मंदिरातून बाहेर पडते. या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

कोल्हापूरमध्ये नेहमीच विविध धार्मिक उत्सव होत असतात. मात्र या विविध उत्सवांत श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या रथोत्सवाचे विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील या रथोत्सवास फार जुनी परंपरा असून ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाई मंदिरात रात्री साडेनऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर 'अंबा माता की जय'च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात होते.

सुंदर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवलेला देवीचा रथ, रथामध्ये विराजमान देवीची उत्सव मूर्ती आणि रथापुढे मानाचा घोडा, तर रथावर देवीचा चोपदार, हवालदार, मशाल आणि सुरक्षा रक्षक आणि परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ होतो. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येते. शाही लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे, गुजरी कॉर्नर येथे आल्यानंतर न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे आतिषबाजी करण्यात येते. येथून रथ पुढे भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात येते. पुढे मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर चौक या मार्गावरून पुढे जात पुन्हा मंदिरात परत येत असतो.

रथोत्सवात ठिकठिकाणी पुष्पवृष्टीसह प्रसादवाटप, सरबतवाटपही सुरू होते. तर हा सोहळा पाहण्यासाठी हजारो कोल्हापूरकर रथोत्सव मार्गावर उतरले होते तर अनेकांनी आपल्या कॅमेरामध्ये हा नयनरम्य सोहळा टिपण्याचा प्रयत्न केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.