ETV Bharat / state

विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन नराधम झाला फरार: सात वर्षानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आवळल्या मुसक्या - THANE POLICE ARRESTED RAPIST

सराफाच्या पत्नीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. यातील नराधम पश्चिम बंगालमध्ये पळून गेला होता. मात्र पोलिसांनी तब्बल 7 वर्षानंतर या नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

THANE POLICE ARRESTED RAPIST
पकडण्यात आलेला आरोपी (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 22, 2025 at 11:03 PM IST

1 Min Read

ठाणे : म्हणतात ना कानून के हात लंबे होते है, तसंच काही ठाणे पोलिसांनी करून दाखावलं आहे. विष पाजण्याची, बदनामीची धमकी देत मारहाण करून सराफाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार करून सात वर्षे फरार असणाऱ्या नराधमास वागळे इस्टेट पोलिसांनी पश्चिम बंगालमधून मुसक्या आवळल्या आहेत. तब्बल सात वर्षानंतर केलेल्या या कारवाईचं सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. अजब अली मज्जीद शेख (34) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सराफाच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार : रामचंद्र नगर परिसरात राहणाऱ्या मनिषा (नाव बदलून) हिच्या नवऱ्याचा सराफाचा व्यवसाय असून त्याचकडं अजबअली हा काम करत होता. घरी येणं जाणं असल्यामुळे अजबअलीनं मनिषा हिला तू मला खूप आवडतेस, असं सांगत होता. मात्र मनिषा त्याला दाद देत नव्हती. 15 सप्टेंबर 2016 या दिवशी अजबअली यानं पोटॅष हे विशारी केमीकल मनिषास पाजण्याची, बदनामी करण्याची धमकी आणि मारहाण करून शारीरिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात अजबअली सोबत काम करणाऱ्या दिवाकर लक्ष्मीकांत साठे आणि संजिब सुजाय मैती यांनी देखील पीडितेला धमकी देऊन अत्याचार केला होता. याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यावर 2018 मध्ये लक्ष्मीकांत साठे आणि संजिब सुजाय मैती यांना पोलिसांनी अटक केली.

सात वर्षांपासून नराधम फरार : गेल्या सात वर्षांपासून फरार असणाऱ्या अजब अलीच्या मागावर पोलीस होते. मात्र वेळोवेळी अजब अली ठिकाण बदलत होता. गुन्हा घडल्यापासून सन 2018 पासून पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेष, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात आपले अस्तित्व लपवून वावरत होता. वारंवार शोध घेतला तरीही तो मिळून येत नव्हता. दरम्यानच्या काळात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट पोलिसांनी तपास करून अजब अलीच्या नातेवाईकांडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खबऱ्याकडून माहिती घेतली आणि अजब अली यास चारमिनार, हैदराबाद, ( मूळ राहणार शेख पाडा, शिराई गल्ली, जि. वर्धमान, पश्चिम बंगाल ) इथून अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.