ETV Bharat / state

मालकाच्या घरी डल्ला मारणारे आंतरराष्ट्रीय नेपाळी त्रिकुट जेरबंद; लाखोंचे दागिन्यासह डॉलर, युरो जप्त - Thane crime

मालकाचा विश्वास संपादन करून घरातील लाखोंच्या दागिनेसह रोख रक्कम, डॉलर आणि युरो साथीदारांच्या साह्यानं डल्ला मारणाऱ्या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांवरून अटक केली आहे. ही कारवाई डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलिसांनी केली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 8:30 PM IST

Thane crime International Nepali
Thane crime International Nepali (Source- ETV Bharat)

ठाणे - मालकाला लुटणाऱ्या गुन्ह्यात आंतरराष्ट्रीय नेपाळी टोळीचा सहभाग आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे. पोलीसही त्याचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी या टोळीतील त्रिकुटाकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी लाखो रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

लीलबहादूर लालबहादूर कामी (45, चायनीज हॉटेलातील हेल्पर, रा. जयराम म्हात्रे यांचा सद्गुरू कृपा बंगला, सेक्टर 10, कामोटे, नवी मुंबई), टेकबहादूर जगबहादूर शाही (40) आणि मनबहादूर रनबहादूर शाही (45, व्यवसाय - हेल्पर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नेपाळ देशातील रहिवासी आहेत. यातील लीलबहादूर कामी याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. तर टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही या दोघांना कर्नाटक राज्यातील बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहेत.

आरोपींनी अशी केली चोरी - पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम डोंबिवलीतील राजू नगर परिसरात असलेल्या धनश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे (31) यांच्या तक्रारीतून शनिवारी 27 जुलै रोजी विष्णूनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार कुंदन म्हात्रे यांच्याकडे सागर विर्श्वकर्मा उर्फ थापा (मूळ रा. नेपाळ) हा नोकर कामाला होता. हा नोकर त्यांच्याकडे दीड वर्षांपासून घरकामाला होता. आरोपी सागर यानं बिल्डींगचे मेन गेट तोडले. त्यानंतर बेडरुममधील कपाटे उचकटून त्यातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने, 10 विविध कंपन्यांची घड्याळे, भारतीय चलनातील रोख रक्क्म, डॉलर व युरो असा 15 लाख 52 हजार 807 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

चोरट्याचा शोध सुरू- अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सपोनि सचिन लोखंडे, उपनि दिपविजय भवर, उपनि अमोल आंधळे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून चोरट्याचा शोध सुरू केला.

लाखोंचा मुद्देमाल जप्त- पोलीस पथकानं लीलबहादूर कामी, टेकबहादूर शाही आणि मनबहादूर शाही यांच्याकडून चोरलेल्या ऐवजापैकी 159 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, 230 ग्रॅम चांदीच्या वस्तू, विविध कंपन्यांची 8 घड्याळे, भारतीय व परकीय चलनाच्या नोटा आणि नाणी असा एकूण 6 लाख 96 हजार 567 रपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मात्र, या तिघांच्या मदतीनं गॅस एजन्सीचे मालक कुंदन म्हात्रे याचा नोकर सागर विर्श्वकर्मा उर्फ थापा अद्याप हाती लागला नाही. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार दिली.

हेही वाचा-

  1. माणूस की हैवान? मुलानं जन्मदात्या आईवरच केला बलात्कार - son raped her mother
  2. मनमाड शहर हादरलं! धारदार शस्त्रानं वार करून माजी नगरसेवकाच्या मुलाची हत्या - Manmad Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.