छत्रपती संभाजीनगर Speeding Scorpio Collide With Car : लग्नाच्या दहा वर्षांनी घरात चिमुकल्याचं आगमन झाल्यानं झालेला आनंद खूप काळ राहिला नाही. पुण्याला जाताना झालेल्या अपघातात बाळासह आई, एक लहान मुलगी आणि अजीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही मन हेलावणारी घटना संभाजीनगर जिल्ह्याच्या लिंबेजळगाव जवळ घडली. यात अमरावती इथल्या मृणाली अजय देसरकर (वय 36), आशालता हरिहर पोपळघट (वय 64) आणि अमोघ देसरकर (वय 6 महिने) दुर्गा सागर गीते (वय 7 वर्षे ) यांचा मृतात समावेश आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेला आनंद क्षणात हिरावल्यानं कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भरधाव स्कॉर्पिओ कारनं समोरासमोर धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला.
दहा वर्षांनी झालं होतं बाळ : अमरावती इथले अजय देसकर हे पुण्यामध्ये अभियंता पदावर काम करतात. ते आणि त्यांची पत्नी मृणाली देसरकर या गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. लग्न होऊन दहा वर्षे झाले तरीही त्यांना बाळ होत नव्हतं. मात्र, सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्यानं कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. या बाळांमुळे त्यांना असलेली चिंता आता दूर झाली, त्याच्या येण्यानं अजय आणि मृणाली यांच्या कुटुंबीयांनी अमरावती इथं या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम आयोजित केला. दोन दिवसांपूर्वी या गोंडस बाळाला अमोघ असं नाव त्यांनी दिलं. मात्र काळाला हे जणू मान्यच नव्हतं, पुण्याला परत जाताना अपघात झाला आणि त्यात मृणाली, सहा महिन्याचं बाळ अमोघ, नातेवाईक असलेली दुर्गा सागर गीते आणि मृणाल यांची आई आशालाता पोपळघट यांचा दुर्दैवी झाला.
पुण्याला जाताना अपघात : बाळाच्या बारशासाठी अजय आणि मृणाल देसरकार या अमरावती इथं आल्या होत्या. सोहळा झाल्यावर अतिशय उत्साही वातावरणात अजय यांनी पुण्याला बाळाची काळजी घेण्यासाठी मृणालची आई आशालता पोपळघट यांना देखील सोबत घेतलं. अमरावतीवरुन सकाळी कारनं चौघंजण पुण्याला जात होते. सायंकाळच्या सुमारास लिंबेजळगाव परिसरात रस्त्यावरुन जात असताना समोरुन भरधाव आलेल्या स्कार्पिओ कारनं देसकर यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मृणाली त्यांच्या आई आशालता, नातेवाईक असलेली 7 वर्षीय दुर्गा आणि सहा महिन्याचा अमोघ यांचा मृत्यू झाला, तर अजय देसकर हे गंभीररित्या जखमी झाले. या अपघाताची वाळूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली.
दोन जणांविरोधात गुन्हा दाखल : भरधाव स्कॉर्पिओमुळे हा अपघात झाला. गंगापूरहून संभाजीनगरकडं येणाऱ्या या स्कॉर्पिओ गाडीत असलेल्या विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22) आणि कृष्णा कारभारी केरे (वय 19) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगात असलेली गाडी नियंत्रणात न आल्यानं ती दुभाजकावरुन उडून थेट समोरुन येणाऱ्या गाडीवर धडकली. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पुढील तपास वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा :
- ऐन गणेशोत्सवात शोककळा: ट्रक आणि बोलोरोचा भीषण अपघात, तीन तरुण ठार - Accident On Nipani Devgad Highway
- ऑडी कार अपघात : अर्जुन आणि रोनितने दारू ढोसल्याचं तपासात स्पष्ट, संकेत बावनकुळेची चौकशी - Nagpur Audi car accident case
- अपघातावेळी ऑडीमध्ये कोण होतं? अखेर नागपूर पोलिसांनी केला खुलासा - Audi Hit and Run Case