ETV Bharat / state

घरगुती सॅनिटरी पॅड्स, डायपर आणि कालबाह्य औषधी कचऱ्याच्या संकलनासाठी महानगरपालिकेकडून विशेष सेवा - MUMBAI

मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

BMC
मुंबई महानगरपालिका (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 22, 2025 at 4:00 PM IST

2 Min Read

मुंबई : वापरलेले सॅनिटरी पॅड्स, डायपर, कालबाह्य औषधी आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींच्या संकलनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने 'घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन' सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. पालिकेच्या माहितीनुसार, यासाठी संबंधित आस्थापनांनी नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची प्रक्रिया २२ एप्रिलपासून म्हणजे आजपासून सुरू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका : याबाबत माहिती देताना घनकचरा विभागाचे उपआयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सध्या रोज सुमारे ७ ते ८ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस, कालबाह्य औषधी म्हणजे इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स आणि ब्यूटी पार्लरमध्ये निर्माण होणारा कचरा आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.

आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू : याच अनुषंगाने मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन' सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी म्हटले आहे. ही सेवा १ मे २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू होणार असून, नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, ब्यूटी पार्लर, महिला वसतिगृहे व शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृती : सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेने एक लिंक जारी केली असून, https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform?pli=1 या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जाणार असून, सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सदर कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही केली जाईल, अशी माहितीही पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. "मला डी कंपनीकडून मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी": बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशान सिद्दीकी यांची माहिती
  2. "महायुतीतील मंत्र्यांना तुडवून हाणलं पाहिजे, तरच तुमचा सातबारा कोरा होणार" - राजू शेट्टी
  3. अनैतिक संबंधातून नागपुरात क्रूर हत्येचा थरार; प्रेयसीच्या नवऱ्यावर कोयत्याने केले सपासप वार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.