ETV Bharat / state

एक भोंगा लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही, तो बंद केला पाहिजे; संजय राऊतांचं नाव न घेता सिद्धेश कदमांची टीका

जनतेच्या मनात संभ्रम आणि विष पेरण्याचं काम करतोय हे कुठे तरी थांबले पाहिजे असल्याची टीका सिद्धेश कदम यांनी नाव न घेता संजय राऊतांवर केलीय.

Pollution Control Board Chairman Siddhesh Kadam
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 4, 2025 at 9:36 AM IST

|

Updated : April 4, 2025 at 10:42 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी- सकाळचा एक भोंगा बंद होत नाही. तोपर्यंत आमचे डोके दुःखी चालू राहणार आहे. माध्यमांनी सकाळचा भोंगा दाखवण्याचे बंद केले पाहिजे. आता हळूहळू भोंगा बंद होतोय. एक भोंगा लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही. कारण नसताना डोक्याला त्रास होतोय. आधी आम्हाला त्रास दिला आता देत नाहीये. मात्र जनतेच्या मनात संभ्रम आणि विष पेरण्याचं काम करतोय हे कुठे तरी थांबले पाहिजे असल्याची टीका सिद्धेश कदम यांनी नाव न घेता संजय राऊतांवर केलीय.

आमच्या सारख्या युवा पिढीला राजकारणात जास्त रस : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष झाल्यानंतर सिद्धेश कदम यांनी प्रथमच 3 एप्रिल रोजी रात्री शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलंय. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आमच्या सारख्या युवा पिढीला राजकारणात जास्त रस आहे. जनतेसाठी आम्हाला काही तरी करायचे आहे. मात्र अशा राजकारणात आम्हाला खेचले गेले तर आम्हाला पाहून नवीन पिढी राजकारणात येणार नाही. आम्ही राजकारणात मुरब्बी आहोत. मात्र नवीन पिढी राजकारणापासून दूर आहे. राज्यात मैत्रीचे राजकारण होते. मात्र एका व्यक्तीमुळे राज्याचे राजकारण बिघडत असल्याची टीका संजय राऊत यांचे नाव न घेता सिद्धेश कदम यांनी केलीय.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम (Source- ETV Bharat)

सिंगल युज प्लॅस्टिक हा चिंतेचा विषय : धार्मिक विषयात ध्वनी खरोखर प्रदूषण करतो का? आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे. या विषयावर मागील आठवड्यात मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत ध्वनी प्रदूषण मंडळ, पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या तिघांनी मिळून एक आराखडा तयार करायचा आहे. धार्मिक स्थळांवरील ध्वनी प्रदूषणाबाबत कोणी आक्षेप घेतला तर यात प्रदूषण होतंय की नाही? याची खात्री करून निर्णय घ्यायचा आहे, असेही कदम यांनी सांगितलंय. देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सिंगल युज प्लॅस्टिक हा चिंतेचा विषय असल्याचं म्हणत किरकोळ विक्रेत्यांवर पाच हजारांचा दंड करण्यापेक्षा असे प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई करण्यात येणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा-

  1. 'वक्फ बोर्डाच्या मोकळ्या जमिनीचा अगोदरच सौदा'; संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले 'पंतप्रधान मोदी जमिनीचा कागद घेऊन . . .'
  2. वक्फ सुधारणा विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नाही; संजय राऊतांचा दावा, म्हणाले 'लाडक्या उद्योगपतींसाठी. . .
Last Updated : April 4, 2025 at 10:42 AM IST