सिंधुदुर्ग : मुलगा धरणात बुडाल्याचा धक्का सहन न झाल्यानं सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पित्याचा अवघ्या काही तासातच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
एकाच वेळी पती आणि मुलाचा मृत्यू : बुडून मृत झालेल्या मुलांचं नाव क्रिश सभंया (18) तर पित्याचं नाव सॅव्हीयो संभाया (48 दोघे हि रा.जुनाबाजार सावंतवाडी) आहे. क्रिश हा मंगळवारी सायंकाळी धरणात बुडाला. तर सॅव्हियो यांचं बुधवारी सकाळी रुग्णालयातच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दरम्यान क्रिश हा एकुलता एक मुलगा होता. एकाच वेळी पती आणि मुलांचे छत्र हरपल्यानं सध्या संभया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- धरणात बुडून झाला मृत्यू : क्रिश संभयाचा कारीवडे येथील धरणात बुडून मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच सॅव्हीयो यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कशी घडली घटना ? : याबाबत अधिक माहिती अशी, क्रिश हा मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमाराला फोटो काढायला धरणाजवळ गेला होता. दुचाकीनं मित्र-मैत्रिणींसह कारीवडे धरणावर गेला होता. धरणाच्या ठिकाणी फोटो काढत असताना त्याचा अचानक पाय घसरला. त्यावेळी तोल जाऊन तो पाण्यात कोसळला. ही घटना घडल्यानंतर तत्काळ पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तसेच बाबल अल्मेडा यांच्या रेस्क्यू टीमनं सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत धरणाच्या पाण्यात क्रिशचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. अखेर, रात्री 11 वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
मुलाच्या निधनाची बातमी समजताच वडिलांचा मृत्यू : मुलगा कारीवडे येथील धरणात बुडाला यांची माहिती सॅव्हीयो संभया यांना देण्यात आली. पण, ही बातमी ऐकून सॅव्हीयो अचानक कोसळले. त्यांना त्वरित कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अशातच बुधवारी त्यांना मुलाच्या निधनाची बातमी समजताच त्यांची प्रकृती आणखी बिघडली. त्यांना मुलाचा विरह सहन झाला नाही. त्यातच त्यांना जोराचा हृदयविकाराच्या धक्का बसला. त्यातच त्यांचं निधन झालं.
हेही वाचा -