ETV Bharat / state

राहाता तालुक्यात भव्य 'शिवमहापुराण कथा'; तीस वर्षांत इतकं भव्य आयोजन पाहिलं नाही, पंडित प्रदीप मिश्रा भावूक

राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित 'शिवमहापुराण कथा महोत्सवा'चा भव्य शुभारंभ सोमवारी झाला.

Shiv mahapuran katha Pandit Pradeep Mishra
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अस्तगाव परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 13, 2025 at 1:20 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं आयोजित 'शिवमहापुराण कथा महोत्सवा'चा भव्य शुभारंभ सोमवारी भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माच्या मंगल वातावरणात झाला. कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांचा महासागर उपस्थित राहिला. गेल्या तीस वर्षांत इतकं मोठं, सुव्यवस्थित आणि भक्तिभावानं ओथंबलेलं आयोजन मी पाहिलं नाही, असं म्हणत पंडित प्रदीप मिश्रा भावूक झाले.

Shiv mahapuran katha
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अस्तगाव परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन (ETV Bharat Reporter)

श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश : शिर्डी नगरी भगवामय झळाळीनं उजळून निघाली होती. 'हर हर महादेव'च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता. भक्तांच्या डोळ्यांत आनंद, श्रद्धा आणि शिवभक्तीची ऊर्जा दिसत होती. मिश्रा महाराजांनी शिवमहापुराणातील पवित्र संदर्भ मांडत भगवान शिवाची उपासना श्रद्धा आणि सदाचार यांचा संदेश दिला. त्यांनी आयोजन, ग्रामस्थांचा सहभाग आणि जनसेवा फाउंडेशनच्या कार्याचं विशेष कौतुक केलं.

Shiv mahapuran katha
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अस्तगाव परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन (ETV Bharat Reporter)

योग्य नियोजनामुळं होतंय कौतुक : आयोजनाचं उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांसाठी केलेल्या सोयी-सुविधांमुळं सर्वत्र जनसेवा फाउंडेशनचं कौतुक होत आहे. पाणी, भोजन, वाहतूक व सुरक्षा या सर्व बाबींमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून, भाविकांना कोणतीही अडचण न येता ते कथासुखाचा आनंद घेत आहेत.

Shiv mahapuran katha
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अस्तगाव परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन (ETV Bharat Reporter)

भक्तीचा महासागर उसळला : पहिल्याच दिवशी लाखो भक्तांनी भगवान शिवाचं दर्शन घेतलं. पुढील चार दिवसांतही भाविकांचा प्रचंड ओघ येथे राहील, असा आयोजकांचा अंदाज आहे. शिर्डीतील ही शिवमहापुराण कथा केवळ धार्मिक सोहळा नसून श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा संगम ठरत आहे. या अध्यात्मिक पर्वामुळं शिर्डी परिसरात नवचैतन्य, आनंद आणि भक्तीचा महासागर उसळला असून, हा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Shiv mahapuran katha
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अस्तगाव परिसरात शिवमहापुराण कथेचं आयोजन (ETV Bharat Reporter)

हेही वाचा -

  1. साईबाबांच्या चरणी 74 लाखांचे सोन्याचे ताट अर्पण; मुंबईतील साईभक्त धरम कटारिया यांची अनोखी सुवर्ण भेट
  2. साईबाबांच्या चरणी एक किलोचा सुवर्णहार अर्पण, यंदाच्या पुण्यतिथी सोहळ्यातील सर्वात मोठं दान