मुंबई : "संजय राऊतांची नीती काही लोकांना पचत नव्हती ते अस्वस्थ होते. त्यांना राऊतांनी उत्तर दिले आहे. त्यांच्या नेहमीच्या लिखाणाने जे दुखावले होते त्याचे योगदान राऊतांच्या अटकेत आहे. 35 कंपन्या अशा होत्या ज्यांमध्ये खूप भ्रष्टाचार होत होता. त्याची माहिती राऊतांनी देशाच्या काही प्रमुखांना दिली. कंपन्यांवर कारवाई झाली नाहीच पण संजय राऊत यांना तुरुंगात जावे लागले," अशा शब्दात आपल्या भावना पुस्तक प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.
संजय राऊत भ्रष्टाचाराविरोधात लिहितात: "जेथे भ्रष्टाचार आहे, त्याविरोधात संजय राऊत नेहमी लिहितात. महाराष्ट्रात काही लोक चुकीचे काम करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, त्यांच्याबद्दल देशातील काही प्रमुख नेत्यांना त्यांनी प्रश्न विचारले. मात्र ते न आवडल्याने संजय राऊतांवर सूडबुद्धीने कारवाई केली गेली," असे मत पवारांनी मांडले. "या सर्वात एका गोष्टीची गमंत वाटते की ही मंडळी नमली नाहीत. सगळी मंडळी एकत्र राहिली. एकमेकांना धीर देत राहिली. संजय राऊत यांच्या तुरुंगातील आठवणी आणि अनुभव, भेटीगाठी यांच्याबाबत पुस्तकात ते व्यक्त झाले आहेत. या पुस्तकावर गेले दोन दिवस प्रचंड टीका होत आहे. सत्ताधारी लोकांना हे पुस्तक न वाचता यामध्ये काय आहे हे कस कळलं हे मला कळत नाही," अशी कोपरखळी पवार यांनी मारली. "सध्या विरोधकांवर केसेस अधिक केल्या जात आहेत. जनतेने पुस्तक वाचल्यानंतर सामान्य माणसाचा अधिकार आहे तो उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आता ईडीला दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा गैरवापर टाळता आला पाहिजे याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. न्यायव्यवस्था हीच आदर्श एकमेव असली पाहिजे. सत्तेचा गैरवापर खूप होत आहे. ही संधी आपण राज्यकरण्यांना दिली ती काढून ही घेतली जाऊ शकते हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे," असे यावेळी पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :