बारामती- राज्यात अग्रेसर असलेल्या श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना एफआरपीची उर्वरित रक्कम 31 मार्चपूर्वी देण्यात येणार असल्याचे सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितलंय. संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे त्यांनी म्हटलंय. तर नुकताच उच्च न्यायालयाने एफआरपी संदर्भातील निर्णय दिलाय. त्या निर्णयानुसार सोमेश्वर सहकारी साखर कारखानाच्या सभासदांना 3173 रुपये एफआरपी बसत असून, यापूर्वी सभासदांना 2800 रुपये प्रमाणे पहिले बिल देण्यात आलंय. त्यामुळे 31 मार्चपूर्वी उर्वरित 373 रुपये दिले जातील. त्याचा उपयोग सभासदांना सोसायटी भरण्यासाठी होईल, असंही जगताप यांनी म्हटलंय.
संचालक मंडळाकडून 3173 रुपये एफआरपीची रक्कम निश्चित : शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली आणि या बैठकीसंदर्भात निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारच्या पूर्वीच्या धोरणानुसार एफआरपीची रक्कम ठरवली जावी, असे कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटले आहे. त्याप्रमाणे मागील वर्षीचा साखरेचा उतार आणि झालेला खर्च याचा विचार केला असता संचालक मंडळाने 3173 रुपये एफआरपीची रक्कम निश्चित केल्याचं पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितलंय.
12 लाख 75 हजार टन उसाचे गाळप होणार : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये सध्या 20 ते 25 हजार टन उसाचे गाळप होणं बाकी आहे. हा उर्वरित ऊस सोमेश्वरच्या संपूर्ण कार्यक्षेत्रांमधून गोळा करून आणायचा आहे. त्यामुळे याला आणखी पाच ते सात दिवस लागतील. या महिना अखेरपर्यंत हा हंगाम संपुष्टात येईल. या हंगामामध्ये साधारणत: 12 लाख 20 हजार ते 25 हजारांच्या दरम्यान उसाचे गाळप होईल, असं पुरुषोत्तम जगताप यांनी म्हटले आहे. उसाची टंचाई असतानादेखील सभासदांनी चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांनी कारखान्याच्या सभासदांचे आभार देखील मानले आहेत.
अजित पवारांच्या मार्गदर्शनासाठी चालतो श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखाना : श्रीसोमेश्वर सहकारी साखर कारखाना 1993 पासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे संचालक मंडळ या कारखान्यावर आहे. या कारखान्याने 1993 पासून नेहमीच लोकांना चांगला भाव दिलेला आहे. मागील वेळीसुद्धा अजित पवार यांच्यावर विश्वास दाखवत सभासदांनी तो अजित पवार यांना मानणाऱ्या संचालक मंडळाच्या ताब्यात दिला होता. सोमेश्वरच्या सभासदांना दिला जाणारा भाव हा चांगला असावा, कारखान्यात कोणताही भ्रष्टाचार नसावा, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आग्रही असतात.
हेही वाचा -