ETV Bharat / state

माझ्या समोरच माझ्या वडिलांना तीन गोळ्या मारल्या...; आसावरी जगदाळेंनी सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना - PAHALGAM TERROR ATTACK

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh Ganbote) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Asawari Jagdale
आसावरी जगदाळे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 5:28 PM IST

Updated : April 24, 2025 at 5:33 PM IST

2 Min Read

पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh Ganbote) या दोघांचा मृत्यू झाला. तर संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिनं हृदय पिळवटून टाकणारी संपूर्ण घटना 'ईटीव्ही भारत'ला सांगितली.

''अजान पढो" म्हणत केली फायरिंग : "मी, माझे आई-वडील आणि वडिलांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची पत्नी असे आम्ही पाचजण जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलो होतो. पहलगाममध्ये बायसरण व्हॅली अर्थात मिनी स्विझर्लंड नावाची जागा आहे. तिथं आम्ही फिरायला गेलो होतो. नॉर्मल टुरिस्ट सारखं आम्ही देखील तिथं फिरत होतो आणि फोटोग्राफी करत होतो. अचानक डोंगरातून फायरिंगचा आवाज आला. आम्ही तेथील लोकल लोकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, "शेर आता है तो ऐसी फायरिंग होती है..." ही गोष्ट आमच्यासाठी नवीन होती. पण काही वेळाने गोळीबाराचे आवाज आले. आम्ही प्रचंडघाबरलो आणि खूप धावपळ सुरू झाली. काही लोक पळायला लागले तर काही लोक हे लपायला लागले. तिथं जे टेंट होते तिथं आम्ही लपायचा प्रयत्न केला. तिथल्या सगळ्यांना दहशतवाद्यांनी गुडघ्यावर बसवलं आणि म्हणाले ''अजान पढो." त्या ठिकाणी फायरिंग करून ते माझ्या वडिलांकडे आले आणि म्हणाले, "अजान पढो." तेव्हा वडील म्हणाले की, आप बोलो वैसे हम करते है. पण ते रागात होते आणि त्यांनी माझ्या वडिलांवर 3 गोळ्या झाडल्या." काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग आसावरी जगदाळे हिनं साश्रू नयनांसह सांगितला.

प्रतिक्रिया देताना आसावरी जगदाळे (ETV Bharat Reporter)

वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : पुढे आसावरी म्हणाली, "त्यानंतर कौस्तुभ गणबोटे यांना उठवलं पण ते उठले नाही तर त्यांच्यावर देखील फायरिंग करण्यात आली. तिथे जे पुरुष होते त्यांच्यावरच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर आम्ही पळून गेलो. काही वेळानं आर्मीचे लोक आले आणि त्यांनी लपलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि आर्मी कॅम्पमध्ये घेऊन आले. रात्री आम्हाला कळलं की माझ्या वडिलांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिथली प्रोसेस करून आज डेड बॉडी पुण्यात आणली आणि वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले."

पर्सनल प्लॅनिंग करून जम्मू-काश्मीरला गेलो होतो : "आम्ही कोणत्याही टूरने गेलेलो नव्हतो. आम्ही आमचं पर्सनल प्लॅनिंग करून एका एजंटच्या माध्यमातून तिकीट बुक करून जम्मू-काश्मीरला गेलो होतो. तसंच त्यांनी आम्हाला एक ड्रायव्हर देखील दिला होता. पहिल्या दिवसापासून ड्रायव्हर आम्ही पुण्यात येऊपर्यंत आमच्या सोबत होते आणि आजही त्यानी कॉल करून विचारपूस केली असं आसावरी जगदाळे हिनं सांगितलं.

हेही वाचा -

  1. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश, पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी
  2. डोक्यात, डोळ्यात, छातीत गोळ्या मारल्या; जगदाळे कुटुंबीयांनी शरद पवारांसमोर मांडला भयावह प्रसंग
  3. पहलगाम दहशतवादी हल्ला : प्राण गमावलेल्या पर्यटकांचे मृतदेह मुंबईत, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Last Updated : April 24, 2025 at 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.