बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case hearing) यांच्या हत्याप्रकरणाच्या खटल्यात वकील उज्ज्वल निकम (ujjwal nikam) यांनी आज (२६ मार्च) पहिल्यांदा युक्तिवाद केला. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी आज एक महत्त्वाचा पुरावा मांडला. वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या बैठका झाल्या. ही गोष्ट पोलिसांनी आरोपपत्रात मांडली. मात्र, या चार्जशीटमध्ये सीडीआर रिपोर्ट नव्हता. याच सीडीआरचा मुद्दा आज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडला.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबीयांचं वकीलपत्र न्यायालयासमोर सादर केलं. त्यानंतर निकम यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या संपूर्ण घटनाक्रमाचा तपशील न्यायालयासमोर मांडला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेची असलेली भूमिका दाखवून देत युक्तीवाद केला.
आरोपीचे वकिलांचा युक्तिवाद : युक्तिवादादरम्यान, सरकारी वकिलांनी सगळी घटना सांगितली. तसंच, अजून आम्हाला आम्ही जी मागणी केलेली त्याची माहिती मिळालेली नाही,. ही माहिती मिळवणं आमचा अधिकार आहे, असं वकिलांनी म्हटलं. तसंच सरकारी वकिलांनी घटनेचा संदर्भ देत असताना सीडीआर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती दिली आहे. त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ती आधी आम्हाला द्यावी त्यानंतरच ही केस चार्ज फ्रेम करावी, अशी मागणी आरोपीच्या वकिलांनी केलीय. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे.
हेही वाचा -