छत्रपती संभाजीनगर : "इकडं तिकडं पाहण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात काय चाललं ते पाहा. चंद्रहार पाटील आमच्याकडं येणार आहे. हिंमत असेल तर थांबवून दाखवा", असे आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते शिरसाट यांनी शिवसेनेला (यूबीटी) दिले. सोमवारी अनेकांचा पक्ष प्रवेश होईल. त्यावेळी पत्रकार परिषदेत अनेक गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.
मोठा भाऊ नंतर कळेल : संजय शिरसाट म्हणाले, मुंबई, ठाणे मनपा निवडणुकीत मोठा भाऊ कोण? हे नंतर ठरवता येईल. निवडणुकीच्या काळात पक्ष सर्व्हेक्षण करतात. फीडबॅक घेऊन पक्षाकडं अहवाल सादर केला जातो. विधानसभेत ८० टक्के सर्व्हेक्षण चुकीचे निघाले. या अंदाजावर राजकीय गणित बांधणं चुकीचं आहे. मात्र, पक्षाची परिस्थिती काय याचा आढावा अशा सर्व्हेक्षणातून घेतला जातो. कोण छोटा भाऊ आणि कोण मोठा भाऊ? अजून हे ठरलेलं नाही. याला अजून वेळ आहे. आजच्या घडीला सांगणं नाही. आता जर सांगितलं की कोण मोठा आणि कोण छोटा तर वाद होईल. कोण कुठल्या ठिकाणाहून लढत आहेत, हे कळल्यानंतर सर्व्हेक्षणाला महत्व राहील."
तुम्हाला सगळेच लोक सोडून जात आहेत. संजय राऊत पक्ष बुडवत आहेत. काँग्रेसने त्यांना दूर ठेवलंय तर, शरद पवारांनी मोहिमेवर पाठवलं आहे. आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे सोबत आल्यास स्वागत आहे, हे म्हणायची लाज वाटते का? कोणाला सोबत घेणार अबू आझमीला की ओवैसीला हे सांगावं-शिवसेनेचे प्रवक्ते, संजय शिरसाट
राज-उद्धव एकत्र आल्यानं फरक पडत नाही : सर्वेमधून येणारी माहिती ही फक्त अंदाज आहे. मुंबई महापालिकेवर आमचा भगवा फडकला पाहिजे. मोठा भाऊ कोण, हे निवडणुकीवेळी ठरेल. जे येईल त्याच्यासोबत युती करू, असे आदित्य ठाकरे म्हणतात. आदित्य ठाकरेंनी स्पष्ट बोलायला पाहिजे. राज ठाकरे येत असेल तर स्वागत करू. कोणताही पक्ष असे का बोलतात? उद्या ओवैसी आणि अबू आझमीसोबत आले तर घ्याल का? असे बेसलेस (अर्थहीन) वक्तव्य करतात, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
शिंदे नाराज नाहीत : मंगळवारी झालेली बैठक ही आमच्या पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत आणि संघटनबाबत होती. काम करताना काय काय अडचणी येतात, याबाबत आमदारांनी सांगितलं आहे. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं की कुठेही वाच्यता करू नका. तिन्ही नेते मिळून मार्ग काढू म्हटले आहेत. इंडिया आघाडी अस्तित्वात राहिलेली नाही. २७ पक्षाचे लोक होते. आता चार मुंडके पाहायला मिळत आहेत. या शिष्टमंडळाला जास्त महत्व द्यायचं कारण नाही, असं शिरसाट यांनी सांगितलं. संजय राऊत हे उबाठा बुडवत आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांना बाजूला ठेवलं. शरद पवार यांना जाणीव होती. त्यामुळे पवारांनी त्यांना मोहिमेवर ठेवलं होतं. आमचा रेट वाढला आहे. आम्ही ८० जागा लढवून ६० जिंकलो. ते १०० लढले २० जिंकलो. त्यामुळं फरक स्पष्ट आहे, असंही संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा -
- संजय शिरसाट म्हणाले, "चंद्रहार पाटलांना थांबवून दाखवा" आणि आता चंद्रहार पाटील म्हणतात, "माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत..."
- मंत्री शिरसाट यांचा हॉटेल व्यवहार वादाच्या भोवऱ्यात, आमच्या मुलांनी व्यवसायात येऊ नये का?, शिरसाटांचा विरोधकांना सवाल
- संजय राऊत यांचे पुस्तक म्हणजे चित्रपटाची स्क्रिप्ट, संजय शिरसाट यांची जोरदार टीका