ETV Bharat / state

''त्यांनी माझ्या समोरच बाबांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या; २० वर्षाच्या मुलावर वडिलांचा मृत्यू पाहण्याची वेळ - PAHALGAM TERROR ATTACK

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेलेंचा मुलगा हर्षल (Sanjay lele Son Harshal) याने अश्रू ढाळत घटनास्थळी नेमकं काय घडलं, हे सांगितलं.

Pahalgam Terror Attack
संजय लेलेंचा मुलगा हर्षल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 8:20 PM IST

2 Min Read

ठाणे : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन मावसभावांचा मृत्यू झाला. यानंतर संजय लेलेंचा मुलगा हर्षलने (Sanjay lele Son Harshal) या हल्ल्याचा थरार सांगितला. जोशी, लेले आणि मोने कुटुंबानं आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी घटनेच्या दिवशी घडलेल्या प्रसंगाचं कथन केलं. यावेळी मृत संजय लेले यांच्या २० वर्षीय मुलानं सांगितलं की, "माझ्या समोर दहशतवाद्यांनी बाबांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, क्षणात काय करावं हे सुचत नव्हतं".

नेमंक काय घडलं? : आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याला आपल्या समोर दहशतवाद्यांकडून ठार मारलं जात असताना, आपण जागीच तडफड, हताशपणे पाहण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही या विचाराने कुटुंबीयांची घालमेल झाली होती. यातच संजय लेले यांच्या कुटुंबीयाचा समावेश होता. लेले यांच्या पत्नीला पार्किनन्सचा त्रास आहे. "घटनेच्या दिवशी हल्ला झाल्यानंतर घोडेवाले सगळे आले. बाकीचे चालत उतरत होते. चालत उतरण्यासाठी आम्हाला चार तास लागले. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तिला मी आणि माझ्या भावाने खांद्यावर उचलून आणलं. काही अंतरावर घोडे होते. मग घोडा करुन आम्ही तिला आधी बेसला पाठवलं. आम्ही चार तास चालत बेसला पोहचलो. मला आणि इतर सगळ्यांना रुग्णालयात नेण्यात आलं" असं हर्षलनं सांगितलं.

माहिती देताना संजय लेलेंचा मुलगा हर्षल (ETV Bharat Reporter)

वडिलांच्या डोक्यावर गोळीबार : दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या (संजय लेले) डोक्यावर होता. बाबा त्यांना सांगत होते की, तुम्ही गोळीबार करू नका. त्यांनी हात वर केला होता. त्यावेळी माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. आधी मला वाटलं माझ्या हातावर गोळी लागली आहे. मी पटकन झुकलो आणि नंतर पाहिलं तर वडिलांचं डोकं पाहिलं तर ते रक्ताने पूर्ण माखलं होते.

पुरुषांचा धर्म विचारुन केला गोळीबार : हर्षल सांगतो की, दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना एका बाजूला केलं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला, लहान मुलं यांना एका बाजूला होण्यास सांगितलं. हे पुरुष कोणत्या धर्माचे आहेत हे पाहण्यासाठी पुरुषांच्या अंगावरील सर्व कपडे काढण्यात आले. ते नग्न झाल्यानंतर ते कोणत्या धर्माचे आहेत याची खात्री पटल्यावर दहशतवाद्यांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या समोर गोळ्या झाडून ठार केलं. माझे बाबा संजय लेले यांनाही दहशतवाद्यांनी कुटुंबीयांपासून खेचून नेत जात असताना कुटुंबीयांनी किंकाळ्या फोडाल्या. हा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांचा टाहो सुरू असताना, दहशतवाद्यांनी संजय लेले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. तर आपले वडील, काका, मामा यांचे मृतदेह सावरण्याची वेळ २० वर्षाच्या संजय लेले यांच्या मुलावर आली. या घटनेने हवालदिल झालेल्या आपल्या आईला सावरत हर्षल बैसरीन टेकडी ते रुग्णालय धावाधाव करत होता.

हेही वाचा -

  1. माझ्या समोरच माझ्या वडिलांना तीन गोळ्या मारल्या...; आसावरी जगदाळेंनी सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना
  2. दहशतवाद्यांनी बाबा, काका आणि मामा यांना डोळ्यांसमोर मारलं-मुलीनं सांगितली हल्ल्याची आपबिती
  3. पहेलगाम हल्ल्याचा परिणाम; कोल्हापुरातून जाणाऱ्या पर्यटकांनी बुकिंग केलं रद्द, 36 कोटींची उलाढाल ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.