ETV Bharat / state

शहाजीराजे आणि मालोजीराजे यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धारासाठी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह - RAIS SHEIKH URGES CHIEF MINISTER

मराठी वीरपुरूषांची समाधीस्थळे साडेतीनशे वर्षे उपेक्षित असल्याची खंत आमदार रईस शेख यांनी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, आजोबा मालोजीराजे समाधी जिर्णोद्धाराची मागणी त्यांनी केलीय.

आमदार रईस शेख
आमदार रईस शेख (Etv Bharat, file image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 14, 2025 at 4:43 PM IST

2 Min Read

मुंबई - शिवाजी महाराजांच्या वडील आणि आजोबांच्या समाधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यासाठी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पुढाकार घेतला आहे. सध्या शिवाजी महाराजांच्या वडीलांची आणि आजोबांची समाधी स्थळे उपेक्षित आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देऊन सरकारने तातडीने त्यांचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

स्मारकांचा विकास करावा - मराठी वीरपुरूषांची ही दोन्ही समाधीस्थळे साडेतीनशे वर्षे उपेक्षित असल्याची खंत शेख यांनी व्यक्त केली. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने त्यांचा जीर्णोध्दार करावा, अशी कळकळीची मागणी आ. शेख यांनी केली आहे. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकाप्रमाणे या दोन्ही स्मारकांचा विकास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.

स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित - ‘स्वराज्याचे संस्थापक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आजोबा मालोजीराजे भोसले यांची अनुक्रमे ‘होदगिरे’ आणि ‘वेरूळ’ येथील समाधी स्मारके साडेतीनशे वर्षे उपेक्षित आहेत. त्याकडे शेख यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक राज्य शासन ज्याप्रमाणे बांधणार आहे, त्याच धर्तीवर या मराठा वीर पुरुषांच्या समाधी स्थळी स्मारक बांधून परिसराचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक सरकारांची घोषणा - आमदार शेख यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यांचे वडील शहाजीराजे भाेसले यांना इतिहासात ‘स्वराज्य संकल्पक’ म्हटले जाते. दक्षिणेत अत्यंत पराक्रम गाजवलेल्या शहाजीराजे भोसले यांचे शिकारी दरम्यान घोड्यावरुन पडून अपघाती निधन झाले. त्यांची समाधी कर्नाटकातील होदगिरे येथे आहे. सदर समाधी स्थळाचा जीर्णोद्धार करण्याची महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेक सरकारांनी घोषणा केली. प्रत्यक्षात समाधी स्थळ अजुनही उपेक्षितच आहे. बेळगाव सीमाभागातील मराठी-कन्नड वादाचा समाधीस्थळाच्या विकासाला फटका बसला आहे.

दोन्ही राजेंचा पराक्रम - छ. शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची समाधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे घृष्णेश्वर मंदिर परिसरात आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथे साधा फलकही नाही. मालोजीराजे भोसले यांनी तत्कालीन अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांच्या साथीने आदिलशाही विरोधातील लढ्यात मोठा पराक्रम केला होता. छ. शिवाजी महाराजांनी पुणे-सुपे जहागिरीतून स्वराज्याचे रणशिंग फुंकले, ती जहागीर मालोजी भोसले यांना मिळालेली होती.

मालोजीराजे भोसले यांच्या येथील गढीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे, तसा दर्जा समाधीला देण्यात यावा. कर्नाटकातील शहाजीराजे यांचे स्मारक केंद्रीय संरक्षित स्मारक आहे. शहाजीराजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी केंद्र सरकारला विनंती करावी. तसेच वेरूळ व होदगिरे या दोन्ही समाधी स्थळांचा उत्तर प्रदेशात आग्रा येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या धर्तीवर स्मारक बांधून विकास करण्यात यावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा...

  1. आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक होणार, अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
  2. "ताजमहाल पेक्षा भारी शिवरायांचं स्मारक उभारणार," देवेंद्र फडणवीसांची आग्रा किल्ल्यावर घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.