नागपूर- शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'सोशा' रेस्टॉरंटच्या मालकावर रात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास गोळीबार झालाय. गोळीबारात हॉटेलचे मालक अविनाश भुसारीचा मृत्यू झालाय. अविनाश भुसारी आणि त्यांचा मित्र 'सोशा' रेस्टॉरंटच्या बाहेर गोळा खात उभे होते. त्याच वेळी दोन दुचाकीवरून आलेल्या 4 हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. आरोपींनी एकूण सहा राउंड फायर केल्यानंतर सर्व तिथून पळून गेले. जखमींला हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलंय. अविनाशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अंबाझरीत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्या वैमनस्यातून अविनाश भुसारी यची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचं दिशेने पोलिसांचा तपास सुरू केलेला आहे. अविनाश भुसारीचा गँगवारशी काहीही घेणेदेणे नसल्याचंदेखील तपासात पुढे आलंय.
हिरणवार गँगचे नाव समोर : वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारीला नागपूर जिल्ह्यातील खपरखेडा भागातील बाबूळखेडा शिवारातमध्ये शेखु टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळीचा पाठलाग करीत अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये पवन हिरणवार नामक तरुणाचा मृत्यू झालेला होता. पवन हिरणवार आणि दोन मित्र कारने जात असताना तीन दुचाकीने आलेल्या पाच आरोपींनी पाठलाग सुरू केला. आरोपींनी पवन हिरणवारच्या कारवर अंदाधुंद गोळीबार केला. ज्यामध्ये एक गोळी पवन हिरणवारला लागली, त्यात पवन हिरणवारचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. पवन हिरणवारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून अविनाश भुसारीवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आलीय.
अविनाशची गोळ्या झाडून हत्या केल्याची चर्चा : पवन धीरज हिरणवार हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी बंटी हिरणवारने अविनाशची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पवन हिरणवार याच्या हत्येत मृतक अविनाश भुसारीच्या चुलत भावाचा सहभाग होता म्हणून आरोपींनी अविनाशची गोळ्या झाडून हत्या केल्याची चर्चा आहे. धक्कादायक म्हणजे अविनाशवर गोळीबार करण्याचा काही दिवसांआधी आरोपींनी 'भाई के बदले भाई' असे स्टेट्स ठेवले होते, अशी माहितीदेखील पुढे आलीय. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलाय.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना आता केवळ 500 रुपयेच मिळणार, कोणत्या कारणास्तव 1000 बंद होणार? जाणून घ्या
मुंबई-गोवा महामार्गाला नवी डेडलाइन, नितीन गडकरी म्हणतात आता 'या' महिन्यापर्यंत काम पूर्ण होणार